शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यासाठी साडेपंधराशे कोटींचा नियोजन आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 16:17 IST

अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत ३० जानेवारीला विभागीय बैठक

ठळक मुद्दे९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चार जिल्ह्यांची बैठक घेतली होती.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी ७६२ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती.

औरंगाबाद :  मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी १ हजार ५५७ कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा शासनाने घालून दिली आहे. जिल्ह्यांच्या डीपीसीतून या आराखड्यांना मंजुरी देण्यात येणार असून, जिल्हा नियोजन व विकास समितीने मंजूर केलेला वार्षिक नियोजन आराखडा २०२०-२१ चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी गुरुवार, ३० जानेवारी रोजी वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विभागातून वाढीव निधीची मागणी करण्यात येणार आहे.

९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चार जिल्ह्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर आता वित्त व नियोजन विभागाची बैठक होणार आहे. नियोजनात विविध क्षेत्रांबरोबर जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा समावेश असतो. ग्रामीण भाग केंद्रस्थानी ठेवून विकास नियोजन करताना जिल्हानिहाय विकासासाठी अधिक निधी मिळावा, या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. गेल्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्याच्या पारड्यात वित्त विभागाने जिल्हा वार्षिक योजनेचा २४८ कोटी अतिरिक्त निधी दिला होता. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी ७६२ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. या तुलनेत २४८ कोटी रुपये वाढीव निधी देण्यात आला होता. 

जिल्हानिहाय निधीचे नियोजनजिल्हा    ठरविलेली मर्यादाऔरंगाबाद    २६५ कोटी ६८ लाखजालना    १८१ कोटी १३ लाखपरभणी    १५६ कोटी ८२ लाखनांदेड    २५५ कोटी ८३ लाखबीड    २४२ कोटी ८३ लाखलातूर    १९३ कोटी २६ लाखउस्मानाबाद    १६० कोटी ८ लाखहिंगोली    १०१ कोटी ६८ लाख

टॅग्स :fundsनिधीMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार