शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्करोग संस्था राज्यातील हजारो रुग्णांचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 11:37 IST

२१ सप्टेंबर २०१२ रोजी आमखास मैदानासमोर सुरु झाले रुग्णालय

औरंगाबाद : राज्यातील हजारो कर्करुग्णांचा शब्दश: मोठा आधारवड ठरलेल्या राज्य कर्करोग संस्था अर्थात शहरातील आमखास मैदानासमोरील शासकीय विभागीय कर्करुग्णालयात गेल्या नऊ महिन्यांत ३२ हजारांवर रुग्णांची तपासणी होऊन साडेचार हजार कर्करुग्णांवर उपचार झाले आहेत. तसेच २७ हजारांपेक्षा जास्त किरणोपचार, १० हजारांवर किमोथेरपी, ८० हजारांवर सर्व प्रकारच्या तपासण्या, तर सव्वादोन हजार छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

'लोकमत' चे एडिटर इन चीफ  राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नातून व अनेक अडथळे पार करीत २१ सप्टेंबर २०१२ रोजी उद्घाटन झालेल्या कर्करुग्णालयामध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा होत गेल्या. २०१६ मध्ये कर्करुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळ‌ाला आणि त्याचबरोबर ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’नेही कर्करुग्णालयाला आपले उपकेंद्र जाहीर केले. तेव्हापासून कर्करुग्णालयाने कात टाकण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या सेवा-सुविधा वाढत जाऊन ‘टाटा’तील तज्ज्ञांच्या सेवाही कर्करुग्णालयात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्याचवेळी कर्करुग्णालयातील डॉक्टरांनाही ‘टाटा’मध्ये प्रशिक्षण मिळण्यास सुरुवात झाली.

याच सुधारणांचा भाग म्हणून ‘टाटा’कडून कर्करुग्णालयाला ‘भाभा ट्रॉन’ हे तीन कोटींचे उपकरणही देण्यात आली. तांत्रिक कारणांमध्ये वर्षभर हे उपकरण धुळखात पडून होते; परंतु मागच्या दोन वर्षात ‘भाभा ट्रॉन’मुळे ५ हजार ७६८ किरणोपचार झाल्यामुळे रुग्णांना मिळालेला आधारही स्पष्ट झाला आहे. त्याशिवाय कर्करुग्णालयातील सर्वच उपचार प्रकारांचे आकडे हजारांवर पोहोचले असून, हे आकडे वर्षागणिक वाढत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे अनेक वर्षे खंडित झालेला ‘एमडी-रेडिओथेरपी’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम मागच्या वर्षापासून कर्करुग्णालयात सुरू झाला असतानाच आता ‘एमसीएच-ऑन्कोसर्जरी’ हा अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद