शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करा : अमित देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:37 IST

Aurnagabad Municiplity Election News महानगरपालिकेवर कॉग्रेसचा तिरंगा झेडा फडकविण्याचे आवाहन

ठळक मुद्दे देशात आणि महाराष्ट्रात येणारा काळ हा काँग्रेसचा मतदार यापुढे भाजपला संधी देतील, असे वाटत नाही

औरंगाबाद : मनपा निवडणुका महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकलाच पाहिजे. यासाठी जिद्दीने कामाला लागा व स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करा, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले.

नूतनीकरण केल्यानंतर गांधी भवनात झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात ते बोलत होते. मनपा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांनी हात वर करावा, असे सुचवत व वर केलेले हात मोजत ‘इथेच २०-३०’ जण इच्छुक दिसत आहेत’ अशी टिपणी त्यांनी केली. देशात आणि महाराष्ट्रात येणारा काळ हा काँग्रेसचा राहणार असून, मतदार यापुढे भाजपला संधी देतील, असे वाटत नसल्याचे नमूद करीत देशमुख यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधी या देशात चांगले काम करू इच्छित आहेत, त्यांचे हात मजबूत करणे हे काँग्रेसचे कर्तव्य होय, अशी साद घातली. याचवेळी वेगवेगळ्या पक्ष संघटनांतील काही कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. हा धागा पकडून लातूरमधील एक किस्सा त्यांनी सांगितला व औरंगाबादमध्ये काँग्रेसमधून अमुक-अमुक यांचा  प्रवेश, असे होणार नाही, असा टोला मारताच उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. यात सहभाग सहभागी होण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.

पक्षनिरीक्षक खान व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पवन डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले.  गुलाब पटेल यांनी आभार मानले. आ. राजेश राठोड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, संजय लाखे पाटील, विलास औताडे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, नामदेव पवार, अहमद चाऊस, डॉ. जितेंद्र देहाडे, शहर महिला अध्यक्ष सरोज मसलगे पाटील, जिल्हाध्यक्षा सुरेखा पानकडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcongressकाँग्रेसAmit Deshmukhअमित देशमुख