शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादच्या कचऱ्यापासून पिशोर येथे खतनिर्मितीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:32 IST

औरंगाबाद येथून पिशोर येथे हिराजी महाराज कारखान्याच्या आवारात आणून टाकलेल्या कचºयापासून खत तयार झाले असून आ. हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिशोर : औरंगाबाद येथून पिशोर येथे हिराजी महाराज कारखान्याच्या आवारात आणून टाकलेल्या कचºयापासून खत तयार झाले असून आ. हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.गेल्या दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील महानगरपालिका हद्दीतील कचरा पिशोर येथील हिराजी महाराज सहकारी साखर कारखान्याच्या आवारात आणून टाकला होता. औरंगाबादची घाण कन्नड तालुक्यात नको म्हणून आ. जाधव यांच्या या कृतीला जोरदार विरोध झाला होता. यावर आ. जाधव यांनी या कचºयापासून जैविक खताची निर्मिती करून शेतकºयांना मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती.त्यानुसार कचºयावर बायोकल्चर फवारणी करण्यात येऊन अनेकदा पलटी मारण्यात आली. सोमवारी (दि.३) सकाळपासून स्क्रीनिंग मशीनद्वारे खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पावसामुळे व्यत्यय आला व खत निर्मिती करण्यास उशीर झाला. सुमारे ८० टन कचºयापासून सुमारे ३० टन जैविक खत निर्माण झाल्याचे प्रकल्प व्यवस्थापक दीपक बोथे यांनी सांगितले. पूर्ण खत तयार होईपर्यंत आ. जाधव हे रात्री उशिरापर्यंत साईटवर ठाण मांडून होते. आपल्या हातात फावडे घेत स्वत: त्यांनी खत गोणीत भरले. यावेळी त्यांच्या चेहºयावर समाधानाचे भाव दिसून येत होते.यावेळी पिशोरसह करंजखेड, वासडी, पिंपरखेडा, गौरपिंप्री, नादरपूर तसेच तालुक्यातील गावांतून आलेल्या शेतकºयांनाही हे जैविक खत तयार होताना बघून सुखदवाटले.यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र मगर, हतनूरचे पं. स. सदस्य किशोर पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत मोकासे, सिद्धेश्वर झाल्टे, गणेश ठोकळ, कैलास दहेतकर, योगेश मोकासे, सुरेश हिंजे, अक्रम पठाण, बाबासाहेब जाधव, प्रदीप बोडखे, सूर्यभान जाधव, भास्कर जाधव, शांताराम जाधव, गंपू जाधव, भास्कर सूर्यवंशी, नीलेश नवले, सचिन जाधव आदींसह परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विरोधकांनाही मोफत खतसदरील कचºयापासून तयार झालेले खत जवळपास ६५० एकर शेतीला पुरेल. विरोधकांनी कचºयाचे राजकारण करून रोगराई पसरेल, अशी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून खत निर्माण होणार नाही, असेही सांगत सुटले होते; परंतु कुणाच्याही आरोग्यास काहीही इजा न होता कचºयापासून खत निर्माण केल्याचा आनंद असून विरोधकांनी मोफत खत आवश्य घेऊन जावे.-आ. हर्षवर्धन जाधव

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMLAआमदार