शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

ST Strike: कर्मचाऱ्यांची घर चालविण्याची कसरत; कोणाच्या हाती ट्रकचे स्टिअरिंग, तर कोणाच्या फावडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 13:03 IST

ST Strike: अडीच महिन्यांपासून संप सुरूच असून कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील संपकरी कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे. संपात सहभागी असलेले काही चालक खासगी वाहन, ट्रकवर बदली चालक म्हणून कामाला जात आहेत, कोणी हातात फावडा घेऊन बांधकामाला जात आहेत, तर काही कर्मचाऱ्यांच्या पत्नी संसाराचे ‘स्टिअरिंग’ सांभाळत आहेत.

एसटी महामंडळातील कर्मचारी गेल्या अडीच महिन्यांपासून संपावर आहेत. अद्याप अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. या सगळ्यात घर चालविण्याची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे बसस्थानकात आंदोलनाच्या ठिकाणी काही वेळ हजेरी लावून कर्मचारी उदरनिर्वाहाच्या दृष्टीने अन्य काम करीत आहेत. वेतनाअभावी कोणाचे घरभाडे थकले आहे, तर कोणाकडे किराणा दुकानदाराची थकबाकी वाढत आहे.

पत्नीच्या हाती संसाराचे ‘स्टिअरिंग’चालक ज्ञानेश्वर मुंढे म्हणाले, बडतर्फीची कारवाई झालेली आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पत्नी शिवणकाम करते. सध्या तिच्यामुळे घर चालत आहे. परिस्थितीमुळे दागिने मोडण्याची वेळ आली. किरायाचे घर आहे. कसे तरी दिवस काढत आहे. न्यायालय जो निर्णय देईल, तो मान्य असेल.

मोलमजुरी करून चालवतोय गाडावाहक उल्हास चव्हाण म्हणाले, सध्या मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवित आहे. मी वाहक आहे. पण, सध्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी कामाला जात आहे. साडेचारशे रुपये हजेरी मिळते. पत्नीदेखील कामाला जात आहे. दोन मुले आहेत. स्वत:चे घर आहे. परंतु कुटुंब चालविण्यासाठी आम्हा दोघांनाही कामाला जावे लागत आहे.

कोणी ट्रकवर, कोणी खासगी वाहनावरसध्या संपावर असलेले अनेक चालक खासगी वाहनावर बदली चालक म्हणून जात आहेत, तर कोणी ट्रकवर चालक म्हणून काम करीत आहे. काही कर्मचारी कपड्याच्या दुकानात काम करीत आहेत. काही कर्मचाऱ्यांची मुले नोकरी, व्यवसाय करतात. तर कोणाचा संसार पत्नीच्या मदतीने सुरळीत सुरु असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

८८ कर्मचारी बडतर्फएसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात आतापर्यंत ८८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे, तर १५७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कामावर येण्याचे आवाहनज्यांच्यावर कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असे आवाहन आहे. आतापर्यंत विभागात ८८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.- अरुण सिया, विभाग नियंत्रक

-एसटी एकूण कर्मचारी-२,६८९-कामावर परतलेले -१,०४८- कामावर न परतलेले -१,६४१

टॅग्स :AurangabadऔरंगाबादST Strikeएसटी संप