शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : प्रस्ताव मान्य नाही, पगारवाढ नको, विलीनीकरण करा; एसीटी कर्मचारी संपावर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 20:39 IST

ST Strike : पगार वाढ फारच कमी आहे, विलीनीकरणामुळेच योग्य तो न्याय मिळेल.

औरंगाबाद : आमचा लढा शासनात विलीकारणाचा आहे, मंत्री महोदयांनी दिलेला पगारवाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. यासाठी ४२ कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले आहे. विलीनीकरण प्रस्ताव स्वीकारणे म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे. आम्ही विलीनीकरणावर ठाम आहोत, असा निर्धार औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. 

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ जाहीर केली. त्यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेणारे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. अनुभवानुसार मूळ वेतनात पगार वाढीचा ऐतिहासिक प्रस्ताव मंत्री परब यांनी सादर करत एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू होण्याची विनंती केली. तसेच कर्मचाऱ्यांवरील निलंबन देखील मागे घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. मात्र, या प्रस्तावास शहरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. 

आमचा लढा विलीनीकरणाचा सिडको, चिकलठाणा वर्कशॉप आणि मध्यवर्ती बसस्थानकात एसीटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप करत आहेत. आज संध्याकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला अमान्य असल्याची भूमिका आंदोलकांनी जाहीर केली आहे. विद्यार्थी, सामान्य जनता यांचे हाल होत आहेत त्याबद्दल आमची सहानभूती आहे. विलीनीकरणाचा फायदा आमच्यासोबत सामान्य जनतेला सुद्धा होणार आहे. पगार वाढ फारच कमी आहे, विलीनीकरणामुळेच योग्य तो न्याय मिळेल, असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAurangabadऔरंगाबादAnil Parabअनिल परब