शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : संपामुळे सोयगाव आगाराचे अजिंठा लेणीतून मिळणारे ४४ लाखांचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 16:30 IST

ST Strike: सध्या एकूण १७ खाजगी वाहने पर्यटकांना सेवा देण्यासाठी लेणीमध्ये उपलब्ध आहेत.

सोयगाव ( औरंगाबाद ) : मागील २२ दिवसांपासून एसटी महामंडळाचे कर्मचाऱी संपावर गेल्याने अजिंठा लेणीची बस सेवा बंद आहे. यामुळे महामंडळाचा जवळपास ४४ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. पर्यटकांचे हाल होत असल्याने सध्या खाजगी वाहनांना परवानगी देऊन पर्यटकांना सेवा देणे सध्या सुरू आहे. 

राज्य सकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात सोयगाव आगाराचे कर्मचारी सहभागी झाल्याने दि.९ नोव्हेंबरपासून अजिंठा लेणीची बससेवा बंद पडली आहे. यामुळे लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत. पर्यकांना बैल गाडी किंवा चालत लेणीपर्यंत जावे लागे. यामुळे पर्यटन विकास महामंडळाच्या मागणी वरून  दि.११.नोव्हेंबरला १० खाजगी वाहनांना पर्यटकांना नेआण करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु ही वाहेन कमी पडत असल्याने दि.१५. नोव्हेंबरला ४ तर दि.३० नोव्हेंबरला आणखी ३ खाजगी वाहनांना परवानगी देण्यात आली. 

आता एकूण १७ खाजगी वाहने पर्यटकांना सेवा देण्यासाठी लेणीमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, लेणीत बस सेवा बंद असल्याने सोयगाव आगाराला मिळणारा २२ दिवसातील तब्बल ४४ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. दरम्यान, लवकरच लेणीतील बस सेवा सुरळीत सुरू होण्याचे संकेत सोयगाव आगार प्रमुख एच.जे.ठाकरे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादST Strikeएसटी संप