शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या बसला एसटीचा विरोध; स्थानकात बस आणू नका म्हणून कंट्रोलरने बजावले

By मुजीब देवणीकर | Updated: August 27, 2022 13:28 IST

रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, बिडकीन, करमाड, फुलंब्री या गावांना सिटी बसच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, ग्रामीण भागातील प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

औरंगाबाद : स्मार्ट सिटीने ग्रामीण भागातही शहर बसची सेवा सुरू केली. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळेच फुलंब्री बसस्थानकावर स्मार्ट बसला उभे राहण्यास मज्जाव करून बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाच्या कंट्रोलरने खाली उतरून दिले. एवढ्यावरच न थांबता यापुढे एकही स्मार्ट बस स्थानकात आणू नका, रस्त्यावर कुठेही उभी करा, असेही कंट्रोलरने बजावले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली. 

शहरालगत २० किमीपर्यंत शहर बस सुरू करण्यात आली. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, बिडकीन, करमाड, फुलंब्री या गावांना सिटी बसच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, ग्रामीण भागातील प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा परिणाम काळी-पिवळी, ॲपेरिक्षावर झाला असून, त्यांच्या प्रवाशांची संख्या एकदम घटली आहे. सुरक्षित प्रवास म्हणून शहर बसला प्रवाशांची पसंती वाढत आहे. फुलंब्रीसाठी मार्ग क्र. ४१ ची बस (क्र. एमएस २० ईएल ३१४५) ही सिडको बसस्थानकावरून दुपारी ४.१५ वाजता सुटली. सायंकाळी ५ वाजता ही बस फुलंब्रीमध्ये पोहोचली. यातील १९ प्रवासी उतरले. त्यानंतर ही बस वळविण्यासाठी बसस्थानकामध्ये नेण्यात आली. 

बसचालक संदीप कोलगे हे बस वळवून घेत असताना काही प्रवासी बसमध्ये चढले. त्याचवेळी एसटी महामंडळाचे स्थानकातील कंट्रोलर या बसच्या समोर आले. त्यांनी बसमधील प्रवाशांना उतरून दिले. बसचालकाला म्हणाले, यापुढे बस वळविण्यासाठी बसस्थानकात आणू नये, आपल्या सहकाऱ्यांनादेखील सांगा. बस रस्त्यावर कुठेही उभी करा, अशी तंबी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.यासंदर्भात स्मार्ट सिटीचे बस व्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांना यांनी सांगितले की, स्मार्ट बस सोबत घडलेली ही आजची घटना आहे. बसस्थानकात बस वळविण्यास विरोध केला असले, तर यापुढे बस रस्त्यावर वळविण्यात येतील. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पत्र दिले जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका