शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

एसीटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार पगार झाला, पण काम केलेल्यांनाच मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 12:55 IST

संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या मूळ पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

औरंगाबाद : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना होत आहे. बहुतांश कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. यात नोव्हेंबरमध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा मंगळवारी पगार झाला. जेवढे दिवस हजर, तेवढ्याच दिवसांचा नव्या वेतनवाढीनुसार पगार देण्यात आला आहे.

एसटी शासनात विलीन करण्याच्या मागणीसाठी ८ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. तब्बल महिना झाला तरी संप सुरूच आहे. संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या मूळ पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहकांचा मोठा हातभार असतो. यापुढे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांनी विशेष कार्य केल्यास त्यांना उत्पन्नवाढीबाबत प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. परंतु वेतनवाढीनंतरही बहुतांश कर्मचारी संपावरच आहेत.

२० ते ३० बस धावतातसध्या २० चालक आणि ८ वाहक कामावर हजर झालेले आहे. त्यांच्या माध्यमातून रोज १० ते १३ लाल बस रवाना होत आहे. तर १० ते १५ खासगी शिवशाही बस पुणे मार्गावर धावत आहेत.

२४१ कर्मचाऱ्यांवर कारवाईएसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात आतापर्यंत १३७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित केल्यानंतर यातील ११ कर्मचारी आतापर्यंत कामावर परतले आहेत. तर तब्बल १०४ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

२० जणांच्या बदल्याएसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांची बदली करण्यास सुरुवात केली आहे. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाने शनिवारी गंगापूर, सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, वैजापूर, सिल्लोड, पैठण, सोयगाव, कन्नड आगारातील २० कर्मचाऱ्यांची इतर आगारात बदली केली.

कामावर हजर होण्याचे आवाहनसुधारित वेतनानुसार आणि नियमानुसार कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन आहे.- अरुण सिया, विभाग नियंत्रक

एकूण एसटी कर्मचारी- २६८४- कामावर हजर झालेले कर्मचारी- ४८४-अद्यापही संपात सहभागी- २२००

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादST Strikeएसटी संप