शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसचालकाची परदेशी पर्यटकांसमवेत बेजबाबदार,उर्मट वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 12:37 IST

त्रस्त पर्यटकांनी वेरूळ येथील पुरातत्व विभागात जाऊन चालकाच्या उर्मट वर्तणुकीबद्दल तक्रार केली.

ठळक मुद्दे एसटी बसचालकाची पर्यटकांसोबत अरेरावी

- ऋचिका पालोदकर 

औरंगाबाद : वेरूळ लेणीत एस. टी. महामंडळाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बसच्या बेजबाबदार कारभारामुळे आणि बसचालकाने परिस्थिती समजून न घेता पर्यटकांवर केलेल्या अरेरावीमुळे अ‍ॅन आणि आर्थर या दोन ऑस्ट्रेलियन पर्यटकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. यामुळे त्रस्त पर्यटकांनी वेरूळ येथील पुरातत्व विभागात जाऊन एस. टी. चालकाच्या उर्मट वर्तणुकीबद्दल तसेच या बसच्या गैरसुविधेबाबत तक्रार केली.

अ‍ॅन आणि आर्थर सोमवारी वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेले होते. लेणी क्र. १६ येथून पुढे जाण्यासाठी ते बसची वाट पाहत होते. एस. टी. महामंडळाच्या दोन बस याठिकाणी उपलब्ध असून, दोन्ही बसमधील चालक त्याच वेळी एकत्र जेवणासाठी बसले. जेवणासाठी अजून एक तास लागेल, असे चालकांनी सांगितले. पण अ‍ॅन आणि आर्थर यांना लवकरात लवकर औरंगाबादला यायचे होते. त्यामुळे अधिक वाट न पाहता ते लेणी क्र. ३२ पर्यंत पायी गेले.

ते तेथे पोहोचल्यावर साधारण १ तासानंतर इतर पर्यटकांना सोडण्यासाठी बस आली. उन्हामुळे आणि वयोमानानुसार अ‍ॅन यांना त्रास व्हायला लागला आणि पुन्हा पायी चालत जाणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांनी परतीचा प्रवास बसने करू द्यावा अशी बसचालकाला विनंती केली. यावर बसचालकाने तिकीट नसल्यामुळे तुम्हाला नेऊ शकत नाही, असे उत्तर दिले. अ‍ॅन आणि आर्थर यांचे गाईड पंकज कवडे यांनीही लेणी क्र. १६  येथे गेल्यावर तिकीट काढतो, पण कृपया अ‍ॅन यांना त्रास होत असल्यामुळे तरी त्यांना बसने येऊ द्यावे, असे चालकाला विनविले. पण यावर चालकाने काय करायचे ते करा, पण मी तुम्हाला नेणार नाही, असे बजावले.

शेवटी कवडे यांनी वेरूळच्या पुरातत्व खात्याशी संपर्क साधून पर्यटकांची अडचण कळविली. यानंतर  पुरातत्व विभागाच्या एक कर्मचाऱ्याने लेणी क्र .१६ येथून तिकीट काढून क्र . ३२ येथे घेऊन गेले आणि त्यानंतर परदेशी पर्यटकांना बसने येता आले. या परिस्थितीमुळे वैतागलेल्या पर्यटकांनी पुरातत्व विभागाला भेट देऊन या गैरसोयीबद्दल लेखी तक्रार दिली. 

दोन्ही ठिकाणी तिकीट मिळावेबस अत्यंत असुविधाजनक आहेत. अनेकदा एकच कंडक्टर कामावर असतो. सहा वाजता शेवटची बस सुटेल असा नियम आहे. पण त्यापूर्वीच चालक पलायन करतात. सकाळच्या वेळेत तर बऱ्याचदा बस उपलब्धच नसते. लेणी क्र. १६ येथूनच बस मिळते. लेणी क्र. ३२ येथूनही परतीचे तिकीट मिळण्याबाबत महामंडळाला वारंवार सांगण्यात आले, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. दोन्ही बसचे चालक एकाच वेळी जेवायला बसतात. त्यामुळे पर्यटका खोळंबून राहतात. 

पर्यटकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष बसच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे पर्यटकांना अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. तासन्तास खोळंबून राहावे लागले. निदान अ‍ॅन आणि आर्थर यांचे वय आणि त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून सहकार्य अपेक्षित होते. पुरातत्व विभाग आणि इतर पर्यटकांकडून या बसविषयी एस.टी. महामंडळाला अनेकदा सूचना करण्यात आल्या आहेत, पण त्याकडे ते दुर्लक्ष करतात. या अप्रिय घटनेमुळे पर्यटक आपल्या शहराची अत्यंत चुकीची प्रतिमा घेऊन गेले. - पंकज कवडे, गाईड

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनstate transportएसटी