शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'सैन्यात जाऊन भावाचे स्वप्न साकारणार';दहावीत ३५ टक्के मिळवणाऱ्या लढवय्या अश्विनीची जिद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 12:24 IST

कमी गुण मिळूनही अश्विनीचा शिक्षणातील उत्साह कमी झालेला नसून तिला शिकून पुढे जायचे आहे.

चापानेर (औरंगाबाद) : शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. यात अनेक विद्यार्थी चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. मात्र चापानेर येथील चंपावती कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी अप्पासाहेब शेलार हिने केलेल्या रेकॉर्डची सगळीकडे चर्चा सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अश्विनीला सर्वच विषयात प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत. सोशल मीडियावरही हा विषय चर्चेत आहे.

अश्विनी शेलार ही चापानेर येथील चंपावती कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील आचारी काम करतात. अश्विनीने दहावीत असताना मन लावून अभ्यास केला. मात्र चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले नाही. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे अश्विनीला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, सामाजिक विज्ञान या सर्व विषयांत ना कमी ना जादा प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत. एकूण ५०० गुणांपैकी ती १७५ गुण मिळवून काठावर पास झाली आहे. मात्र तरीही अश्विनीच्या नावावर सर्वच विषयांत समान गुण मिळाल्याने रेकॉर्ड तयार झाला आहे. कमी गुण मिळूनही अश्विनीचा शिक्षणातील उत्साह कमी झालेला नसून तिला शिकून पुढे जायचे आहे. चंपावती विद्यालयाचा निकाल ९३.८२ टक्के लागला असून ८१ पैकी ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम क्रमांक पायल सुनील चुंगडे(९२ टक्के), द्वितीय क्रमांक संचिता नारायण पवार(८८.०८) तर तृतीय क्रमांक साक्षी साहेबराव घुले (८७.०६) हिचा आला.

लष्करात जाऊन भावाचे स्वप्न पूर्ण करायचेअश्विनीचे वडील आचारी काम करतात. घरची परिस्थिती जेमतेम आहे. अश्विनीला तीन बहिणी व एक भाऊ आहे. तर मागील वर्षी अकरावीत शिकणारा एक भाऊ धरणात बुडून मरण पावला. त्याला भारतीय लष्करात जायचे होते, त्यानुषंगाने तो तयारीही करीत होता, मात्र नियतीने त्याला हिरावून नेले. आता त्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे असून लष्करात जायचे असल्याचे अश्विनीने लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान