शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

SSC Result : औरंगाबाद विभागाचा ९९.९६ टक्के निकाल; विशेष प्राविण्यात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 16:04 IST

SSC Result of Aurangabad Division : औरंगाबाद विभागात नियमित परिक्षार्थी म्हणून १ लाख ७६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले.

ठळक मुद्देविभागात १०६३ पुनर्परिक्षार्थी तर १७४ बहिस्त विद्यार्थी, तर ६७ नियमीत विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद विभागातील १ लाख ७६ हजार २२३ (९९.९६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी बाजी मारली असून यंदा ९९.९५ टक्के मुले तर ९९.९७ मुली टक्के मुली दहावी पास झाल्या. तर प्राविण्य श्रेणीत सर्वाधिक तर केवळ उत्तीर्ण श्रेणीत सर्वात कमी विद्यार्थी आहेत.

औरंगाबाद विभागात नियमित परिक्षार्थी म्हणून १ लाख ७६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. त्यापैकी १ लाख ७६ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. एकूण निकालात ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्राविण्य श्रेणीत ९६,५४२, प्रथम श्रेणी ६० ते ७४ टक्के दरम्यान ७१ हजार ७७४, द्वितीय श्रेणी ४५ ते ५९ टक्के ७ हजार ७२१ तर ३५ टक्के व उत्तीर्ण श्रेणीत केवळ १८६ विद्यार्थी आहेत.

पुनर्परिक्षार्थ्यांत ८ हजार ८७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार ८४९ विद्यार्थ्यी प्रविष्ठ झाले असून ७१७२ विद्यार्थई उत्तीर्ण झाले. एकुण ८१.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणी ५९, प्रथम श्रेणी ३४०, द्वितीय श्रेणी ३३३, तर उत्तीर्ण श्रेणीत ६४४० विद्यार्थी आहेत.कला गुणांसाठी १३ हजार १७४ तर क्रीडा गुणांसाठी ७९० प्रस्ताव आले होते त्याचा आंतर्भाव निकालात करण्यात आलेला आहे. १२६७ जणांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यात अनेकांची कागदपत्रांची पुर्तता नाही. तर काही राखीव निकालातील विद्यार्थी अपघाती, कोरोनामुळे, नैसर्गिक मृत्यू ओढावल्याचेही बोर्डाकडे कळवण्यात आले आहे. असे बोर्डाकडून सांगण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांच्यासह बोर्डाचे अधिकारी उपस्थिती होते.

त्रुटी पुर्ण झाल्यावर वाढेल निकालविभागात १०६३ पुनर्परिक्षार्थी तर १७४ बहिस्त विद्यार्थी, तर ६७ नियमीत विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत. त्रुटी पूर्ण झाल्यावर त्यांचा निकाल लागेल. त्यासाठी शाळांशी बोर्डाकडून संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करण्याचे सांगण्यात येत आहे. त्या त्रुटींच्या पुर्ततेनंतर निकालाचे प्रमाण वाढेल. गुणपत्रिकेत त्रुटी, शंका वाटल्यास शाळांशी संपर्क साधावा, मुल्यांकनाची सर्व प्रक्रीया शाळा स्तरावर झाली आहे. पुनर्मुल्यांकनाची सुविधा या परिक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसेल. असे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.

विभागात श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थीजिल्हा - प्राविण्य श्रेणी - प्रथम श्रेणी - द्वितीय श्रेणी - उत्तीर्णऔरंगाबाद -३३,११६ -२६,६२८ -३,०८२ -७८बीड -२५,८६२ -१३,५६१ -१,१११ -१८परभणी -१५,३३८ -१०,४०४ -१,१७६ -१४जालना -१४,७६१ -१३८१९ -१,७७० -६७हिंगोली -७४९५ -७३६२ -५८२ -९

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबाद