शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

भरधाव हायवाच्या धडकेत एकजण ठार; प्रकरण दडपण्यासाठी राजकीय शक्तीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 19:18 IST

जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या कामावर चालणाऱ्या हायवा चालकांची दादागिरी वाढली

ठळक मुद्देहायवा राजकीय पुढाऱ्याचा असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्नरस्त्याची व प्रवाशांची पर्वा न करता ते भरधाव वेगाने हायवा चालवतात

सिल्लोड: तालुक्यातील माणिकनगरजवळ शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या कामावर खडी वाहतूक करणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याच्या हायवाने समोरून येणाऱ्या एका बाईक आणि सायकलस्वारास जोराची धडक दिली.त्यात दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. रात्री उशिरा जखमींना उपचाराचा खर्च देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. अजूनही या प्रकरणी हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, जखमीचे जाब जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी लोकमतला दिली.

या अपघातात समाधान भुजंगराव भाकडे (३४, रा. आमखेड़ा ता. चिखली जि. बुलढाणा ह. मु. औरंगाबाद ) यांचा मृत्यू झाला. तर गजानन भिमराव शेळके (३०, रा. भवन) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण समाधान भाकडे दुचाकीवरुण क्रं (एमएच- २०, सिएन- ७३४८) फत्तेपूर येथून नातेवाईकाचे लग्न आटपून औरंगाबादला जात होता. तर जखमी गजानन शेळके भवनहून सायकलवर  हॉटेल शिवनेरीजवळील आपल्या घरी जात होता. या दरम्यान खडीने भरलेला हायवा क्रं. (एमएच- २०, ईएल- २१५१) सिल्लोडकडे जात होता. हायवाने आधी सायकलस्वाराला जोराची धडक दिली. त्यानंतर समोरून येणाऱ्या बाईकस्वारास जोराची धडक देऊन  हायवा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. दोघांवर प्राथमिक उपचारकरून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात पाठवले. यात समाधान भाकडेचा उपचारासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. तर गजानन शेळके यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

फक्त अपघाताचा गुन्हा दाखल....एका हायवाने रात्री एका मोटार सायकल स्वारास व सायकल स्वारास चिरडले असले तरी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात केवळ अपघात दाखल आहे.कुणी तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही. जखमी व्यक्तीचा जबाब घेऊन रविवारी या प्रकरणी हायवा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण बिडवे, बिट अंमलदार पवार यांनी दिली.

राजकीय पुढाऱ्याचा हायवा...सादर हायवा जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा असल्याने हे प्रकरण रात्री दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला.अपघात होताच जखमींना औरंगाबाद येथे पाठवून खर्च भरून देण्याचे सांगण्यात आले. त्या नंतर लगेच जेसीबीच्या सहाय्याने हायवा रोड वरून काढून गुप्त ठिकाणी जमा करण्यात आला. मात्र त्यात एकाचा मृत्यू झाल्याने आता या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो.

भरधाव वेगाने चालतात हायवा..जळगाव औरंगाबाद रस्त्याचे काम सुरू आहे त्यावर खडी मुरूम वाहणारे हायवा प्रवाशांसाठी डोके दुःखी बनले आहेत. रस्त्याची व प्रवाशांची पर्वा न करता ते भरधाव वेगाने हायवा चालवतात त्यांच्यावर कार्यवाही करून चालकांना समज द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद