गुन्हे शाखेची कारवाई: इंग्लड-पाकिस्तान सामन्यावर सुरू होती सट्टेबाजीलोकमत न्यूज नेटवर्कजालना : आयसीसी चँम्पियन ट्रॉफीतील इंग्लड-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणारा संशयित मनोज रमेशचंद्र अग्रवाल (३६, रा. कडबीमंडी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही आदी साहित्य जप्त केले आहे.शहरातील मामा चौक परिसरात एक व्यक्ती जास्त पैशाचे अमिष दाखवून क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री शहरातील कडबीमंडी भागात छापा टाकला. त्या वेळी संशयित अन्य व्यक्तींशी फोनवरून संपर्क करत इंग्लड-विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा लावताना मिळवून आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंंह गौर, उपनिरीक्षक वारे, ठाकूर, संतोष सावंत, भालचंद्र गिरी, कैलास जावळे, विष्णू चव्हाण, प्रशांत देशमुख, रामेश्वर बघाटे, वैभक खोकले आदीनंी ही कारवाई केली.
चँम्पियन ट्रॉफीवर सट्टा, एक अटकेत
By admin | Updated: June 16, 2017 00:54 IST