शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन

By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST

शिवाजी राजूरकर, नवीन नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसीच्या वतीने आयोजित ‘सहयोग-२०१४’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवास प्रारंभ झाला़

शिवाजी राजूरकर, नवीन नांदेडस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसीच्या वतीने आयोजित ‘सहयोग-२०१४’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला़ पहिल्या दिवशी विद्यार्थी कलावंतांनी काढलेल्या शोभायात्रेचे उद्घाटन कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाले़ या शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या विविध लोककलेचे दर्शन झाले़ शिवाय मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी देखाव्याच्या माध्यमातून मतदार जागृतीचा संदेशही देण्यात आला़ यंदाचा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव सहयोग सेवाभावी संस्थेच्या परिसरात होत आहे़ या महोत्सवासाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड या चार जिल्ह्यांतील विद्यार्थी-कलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत़ उद्घाटनप्रसंगी कुलसचिव भगवंत पाटील, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ़ दीपक पानसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ़ गणेश शिंदे, प्राचार्य विश्वनाथ भरकड, प्रा़ तुकाराम इंगोले, डॉ़ विवेक इनामदार, प्रा़राजशेखर कुंबार, प्रा़नदीम खान आदी उपस्थित होते़ शनिवारी सकाळी काढलेल्या शोभायात्रेत गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाच्या संघाने वारकरी संप्रदायावर आधारित संत जनाबाई व संत विठोबा यांच्या देखाव्याचे सादरीकरण केले़ विष्णूपुरी येथील इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसीच्या संघाने लोककला प्रकारातील गोंधळ तर भोकर येथील कै़दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या संघाने संत गाडगे महाराज यांच्या संकल्पनेतील स्वच्छता अभियानावर आधारित दृष्यासह मतदार जनजागृती केली़ पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या संघाने वाघ्या-मुरळी व धनगर नृत्य सादरीकरणासोबतच महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांचे दर्शन घडविले़ कंधार येथील शिवाजी कॉलेजच्या संघाने पोतराज, वासुदेव व वाघ्या-मुरळी आदी लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले़ किनवट येथील बळीराम पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी लोकनृत्य सादर केले़ लातूर येथील बसवेश्वर फार्मसी कॉलेजच्या संघाने धनगर नृत्य सादर केले़ सोनपेठ येथील राजीव गांधी वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ हा कला प्रकार सादर केला़ नांदेड येथील एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, गोहत्या विरोधी अभियान राबविण्यासोबतच प्लास्टीकचा वापर टाळा, प्रदूषणाला आळा घाला हा संदेश दिला़ वाघ्या मुरळी हे लोकनृत्य सादर करत हम सब एक है़़़ असा नारा देवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले़स्वारातीम विद्यापीठ उपकेंद्र लातूर येथील संघाने सर्वधर्म समभावनेचा संदेश देत मतदान करू या, भारत बनवू या़़़ अशा घोषणा देत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले़ सेलू येथील ज्ञानसाधना महाविद्यालयातील लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासोबत आधुनिक पिढी आपली संस्कृती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत असल्याचा सजीव देखावा सादर केला़ सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या संघाने मतदानदिनी मतदान करण्यासाठी मिळालेल्या सुटीचा उपयोग हॉली डे साजरा केल्याबद्दल नाराजी दर्शविली़ कोळी, पोतराज, आदिवासी, धनगर गोंधळी आदी नृत्य कलाप्रकारासोबत स्वच्छता अभियान, पाणी आडवा पाणी जिरवा, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश शोभायात्रेतून दिला़