शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

औरंगाबादमधील 'त्या' दोन स्पा मध्ये मिळाला १३ लाखाचा मुद्देमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 18:47 IST

प्रोझोन मॉल मधील दोन स्पा सेंटरवर धाड मारून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. त्या दोन्ही स्पा मध्ये ८लाखाची रोकड, तीन लॅपटॉप, मोबाईल आणि इतर किंमती वस्तू, विदेशी चलन असा सुमारे १३ लाख ४५ हजार ९७५रुपयांचा मुद्देमाल मिळाला.

ठळक मुद्देगुरूवारी रात्री झालेल्या  कारवाईविषयी अधिक माहिती देण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. स्पा चालकासह, तेथील दोन मॅनेजर आणि तीन ग्राहकांना पोलिसांनी अटक केली तर ९ विदेशी आणि ३ स्थानिक मुलींची सुटका केली. दोन्ही स्पा मध्ये ८लाखाची रोकड, तीन लॅपटॉप, मोबाईल आणि इतर किंमती वस्तू, विदेशी चलन असा सुमारे १३ लाख ४५ हजार ९७५रुपयांचा मुद्देमाल मिळाला.

औरंगाबाद : प्रोझोन मॉल मधील दोन स्पा सेंटरवर धाड मारून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. त्या दोन्ही स्पा मध्ये ८लाखाची रोकड, तीन लॅपटॉप, मोबाईल आणि इतर किंमती वस्तू, विदेशी चलन असा सुमारे १३ लाख ४५ हजार ९७५रुपयांचा मुद्देमाल मिळाला. हा स्पा चालकासह, तेथील दोन मॅनेजर आणि तीन ग्राहकांना पोलिसांनी अटक केली तर ९ विदेशी आणि ३ स्थानिक मुलींची सुटका केली. 

गुरूवारी रात्री झालेल्या  कारवाईविषयी अधिक माहिती देण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे  यांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी सिडको ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, मसाज पार्लरच्या नावाखाली दी स्ट्रेस स्पा आणि अनंतरा स्पा मध्ये छुप्या मार्गाने आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट सुरू होते. या रॅकेटविषयी माहिती मिळताच पोलिसांनी गुरूवारी रात्री डमी ग्राहक पाठवून तेथे छापा मारला. या छाप्यात रोहन राजेंद्र कुलकर्णी, अकीब अक्रमखान पटेल, विदेशी नागरीक येमेन अब्ुदल हमीद हे ग्राहक पोलिसांच्या हाती लागले. हे दोन्ही स्पा मुंबईतील एकच व्यक्ती चालवित असल्याचे समोर आले. त्याच्या मालकाचे अचुक नाव अद्याप समोर आले नाही.  दी स्ट्रेस स्पा येथे हा असिस्टंट मॅनेजर म्हणून आरोपी सुनील कचरू नवतुरे , शेख तौफिक शेख अफसर हे तर रूम बॉय म्हणून आरोपी राहुल माणिकराव नलावडे काम करायचा. त्यांनाही पोलिसांनी अटक केली. याशिवाय अनंतरा स्पा सेंटरची स्थानिक मॅनेजर महिला असून तिलाही पोलिसांनी अटक केली.

विदेशी मुली पुरविण्याचे अमिष आरोपी हे स्पा च्या नावाखाली वार्षिक पॅकेज ग्राहकांकडून घेत आणि त्यांना मसाज करू न देण्याच्या नावाखाली स्पा मध्ये बोलवत. स्पा सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर तेथील तरूणींना मसाज करण्यास सांगून त्या मुली ग्राहकांना सेक्स संदर्भात आॅफर देत आणि तेथून पुढे त्या विषयीचा वेगळे चार्जेस ते आकारत. विशेष म्हणजे हे चार्जेस केवळ रोख स्वरुपातच घेतले जात. विशेष म्हणजे ग्राहक किती देऊ शकतो, यानुसार ते पाच हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपये ग्राहकांकडून उकळत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcidco aurangabadसिडको औरंगाबाद