परळी: येथील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी राज्यभरासह राज्याबाहेरील भाविक दर्शनासाठी येत आहेत. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी मंदिराच्या ट्रस्टसोबत बैठक घेतली.श्रावण सुरू झाला असल्याने वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. या दरम्यानच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. श्रावण सोमवारी दीड लाखाहून भाविक येथे येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. दरम्यान, अधीक्षक रेड्डी यांनी मंदिराच्या ट्रस्टीसोबत बैठक घेतली. या बैठकीला देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख व इतरांसोबत चर्चा केली. तसेच येथे काय अपेक्षित आहे याची माहितीही करुन घेतली.यापूर्वीही झाली मंदिराची तपासणीवैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांनी नुकतीच पाहणी केली आहे. या पाहणीसाठी स्वत: पोलीस अधीक्षक उपस्थित होते. पोलिसांसह डॉग स्क्वॉडमार्फत मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली होती.वैद्यनाथाच्या पिंडीला चांदीच्या नागाचा फणानागपंचमीच्या निमित्ताने वैद्यनाथाच्या पिंडीला चांदीच्या अलंकाराचा फणा लावण्यात आला. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात अंजली जोशी यांच्या नारदीय कीर्तनाला सुरुवात झाली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.(वार्ताहर)
एसपींनी घेतली सुरक्षा संदर्भात बैठक
By admin | Updated: August 2, 2014 01:50 IST