परभणी : तालुक्यातील सोन्ना येथील एका शेतकऱ्याने नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे शेतामध्ये पेरले होते. परंतु हे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सोन्ना येथील शेतकरी सुधाकर आंबादासराव देशमुख यांनी ईगल या कंपनीचे सोयाबीन बियाणाचे १६ बॅग घेतले होते. या बॅगची एकूण किंमत ४० हजार रुपये एवढी आहे. १२ ते १३ जुलै रोजी शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. परंतु हे बियाणे उगवलेच नाही. केवळ १० ते १२ टक्केच बियाणे उगवले आहे. त्यामुळे सुधाकर देशमुख या शेतकऱ्यास दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. कंपनीच्या बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे तब्बल ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई द्यावी व कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सुधाकर देशमुख यांनी तालुका कृषी अधिकारी व अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
सोयाबीनचे बियाणे सोन्ना भागात उगवेना
By admin | Updated: July 30, 2014 00:47 IST