शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

७१ टक्के क्षेत्रावर होणार सोयाबीनचा पेरा

By admin | Updated: June 6, 2016 00:26 IST

लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार

लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचा कृषी विभागाचा निष्कर्ष असून, केवळ २९ टक्के क्षेत्रावर अन्य पिके घेतली जातील. त्यामुळे कृषी विभागाने सोयाबीनच्या बियाणांबाबत तसेच खताच्या पुरवठ्याचे नियोजन केले असून, २.५८ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार आहेत.लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ३ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. ५ लाख ५६ हजारांपैकी ३ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. ७१ टक्के क्षेत्र सोयाबीनने व्यापणार आहे. केवळ २९ टक्के क्षेत्रावर तूर, मूग, उडीद, साळ, हायब्रीड ज्वारी, सूर्यफुल, तीळ, भुईमूग, लहान कारळ, पिवळी ज्वारी आदी पिके घेतली जाणार आहेत. हायब्रीड ज्वारी ७५ हजार हेक्टर, तूर १ लाख १ हजार हेक्टर, मूग २० हजार, उडीद ११ हजार आणि कापूस २ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. पण सोयाबीनचा पेरा तब्बल ३ लाख ९७ हजार हेक्टर होणार आहे. या खरीप पिकासाठी ऐनवेळी शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये म्हणून बियाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. एकूण बियाणे २.५८ लाख क्विंटल लागणार आहेत. या बियाण्यात गतवर्षीचे सोयाबीन ३० टक्के बियाणे म्हणून उपलब्ध होईल. १.३० लाख शेतकऱ्यांकडून बियाणे उपलब्ध होतील. तर विविध कंपन्यांकडून १.२९ लाख बियाणे उपलब्ध होत आहेत. महाबीजकडून ८० हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यापैकी ६५ हजार क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहेत. अन्य कंपन्यांकडूनही बियाणे उपलब्ध होत असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रबी हंगामातील ४२ टन खत शिल्लक असून, तो खरीप हंगामासाठी वापरता येणार आहे. शिवाय, या हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक टन खत मंजूर झाला असून, रबी व या हंगामातील मिळून १ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खताची या हंगामात कसलीही कमतरता भासणार नाही, असेही जिल्हा विकास कृषी अधिकारी रणदिवे यांनी सांगितले. सोयाबीन बियाणासाठी महाबीजची एक बॅग २५०० रुपयाला असून, महाबीज गुजरात २३५० रुपये, महाबीज गुजरात २७०० रुपये, रायझिंग सीडस् २५५०, एमटीके यशोदा २५०० रुपयाला उपलब्ध आहे. ही एमआरपी किंमत असून, या एमआरपी किंमती पाहूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावेत. त्याची पावती विक्रेत्यांकडून हस्तगत करावी. सोयाबीन उगवेपर्यंत ती जपून ठेवावी. काही तक्रार असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक खताची गरज आहे. परंतु, रबी हंगामातील ४२ हजार मेट्रिक टन आणि यंदा या हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आला आहे. एकूण १ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झालेला आहे. गरजेपेक्षा ४६ हजार मेट्रिक टन खत आपल्याकडे अधिकचा आहे. त्यामुळे खत टंचाई यंदा उद्भवणार नाही, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.