शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेला धडा शिकवणार; भाजपचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:39 IST

राममंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी जल्लोष केल्यामुळे दाखल केलेल्या गुन्ह्यांचा पदाधिकाऱ्यांनी केला निषेध

ठळक मुद्दे राज्यामध्ये सध्या निजामशाहीचे राज्य असल्याचे दिसून येत आहे. राममंदिर उभारणीच्या पायाभरणीचा जल्लोष भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरभर केला.

औरंगाबाद : अयोध्या येथे ऐतिहासिक राममंदिराचे भूमिपूजन होत असताना देशातील प्रत्येक हिंदूच्या घरात दिवाळी साजरी करण्यात येत होती. मात्र, हिंदुत्व सोडलेल्या शिवसेना सरकारने औरंगाबादेत ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करणाऱ्या भाजपच्या कार्येकर्ते, पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. याचा निषेध करीत हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेला आगामी काळात धडा शिकविणार असल्याचा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी  पत्रकार परिषदेत दिला. 

राममंदिर उभारणीच्या पायाभरणीचा जल्लोष भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरभर केला. त्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असून, पोलीस त्यांना अटक करीत आहेत. या अटकेचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला शहराध्यक्ष संजय केणेकर, आ. अतुल सावे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, डॉ. राम बुधवंत उपस्थित होते. 

केणेकर म्हणाले, ज्याठिकाणी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा आणि शिवसेनाचा जन्म झाला त्या गुलमंडीवर राम जन्मभूमीचा आनंद साजरा करणाऱ्या १५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिवसेना हिंदुत्व विसरली आहे. आगामी काळात शिवसेनेला धडा शिकवला जाईल. हिंदुत्व काय असते हेसुद्धा दाखवून दिले जाईल.  राममंदिरासाठी भाजपचे पदाधिकारी अटक होण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.

यापेक्षा  दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाहीआ. सावे म्हणाले, राज्यामध्ये सध्या निजामशाहीचे राज्य असल्याचे दिसून येत आहे. लोकांच्या आस्थेचा विषय मार्गी लागला, त्याचा आनंद साजरा केला जात असताना गुन्हे दाखल होत असतील, तर त्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही. काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना हिंदूंवर गुन्हे दाखल होत आहेत, ही शोकांतिका आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद