शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

विट्स हॉटेल लिलावातून मुलगा माघार घेणार; मंत्री शिरसाटांची भूमिका स्पष्ट, विरोधकांना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:12 IST

“तुम्ही जर खरोखरच इतके प्रामाणिक आहात, तर हे हॉटेल विकत घेऊन दाखवा.” असे आव्हान मंत्री संजय शिरसाट यांनी दिलं

छत्रपती संभाजीनगर: येथील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेवरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या लिलावात अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या आरोपांना उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. “माझ्या मुलाने या हॉटेलच्या लिलावात सहभाग घेतला, पण लिलाव प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तरीही भ्रष्टाचाराच्या आरोपांचं खोटं चित्र उभं केलं जात आहे. त्यामुळे मी मुलाला या प्रक्रियेतून माघार घेण्यास सांगणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. “तुम्ही जर खरोखरच इतके प्रामाणिक आहात, तर हे हॉटेल विकत घेऊन दाखवा. मी तुमच्या स्वागतासाठी स्वतः हजर राहीन.” असे थेट आव्हान शिरसाट यांनी विरोधकांना दिलं आहे. 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांच्यावर आरोप करताना, हॉटेल बाजारभावाच्या तुलनेत खूपच कमी किमतीत म्हणजे ६७ कोटींना मिळाल्याचा दावा केला. रेडीरेकनरप्रमाणे या हॉटेलची किंमत सुमारे ११० कोटी रुपये असल्याचे ते म्हणाले. यावर शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, “हा लिलाव कोर्टाच्या आदेशानुसार झाला आहे. सध्याची रक्कम केवळ सुरुवातीची आहे; अंतिम व्यवहार पूर्ण झालेला नाही.” पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, “राजकारणात आरोप करा, मी उत्तर देईन. पण वैयक्तिक आरोप केले, तर मीही तुमच्यावर माहिती उघड करीन. तुमच्या दलालीपासून ते स्टोऱ्यांपर्यंत सर्व काही माझ्याकडे आहे.”

मुलाला लिलावातून माघार घेण्यास सांगणार"लिलावात उतरण्याआधी काही रक्कम भरावी लागते, मग २५ टक्के रक्कम भरावी लागते. त्यानतंर कोर्टात उर्वरित ७५ टक्के रक्कम भरावी लागते. आता ६७ कोटी ही किंमत कोर्टाने ठरवलेली आहे. पण पुढे प्रक्रिया काहीही झालेली नाही. जो व्यवहार पूर्ण झालेला नाही, त्यावरून टीका सुरू झाली. माझ्यावर जे आरोप झालेत त्यामुळे मी माझ्या मुलाला या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्यास सांगणार आहे", असंही संजय शिरसाट म्हणाले. तसेच शिरसाटांनी असा इशारा दिला की, वैयक्तिक पातळीवरील आरोप सुरू राहिल्यास तेही धक्कादायक खुलासे करतील. हे प्रकरण पुढे आणखी गंभीर राजकीय वळण घेण्याची शक्यता आहे. “मी संजय शिरसाट आहे. कोणाच्या घराला आग लावायला कमी नाही. चोख उत्तर देईन. व्यवसायात खोडा घालण्याचे पाप तुम्हाला फेडावे लागेल.” 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर