शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

'काहींनी ते कपडे जाळूनही टाकले'; रोहित पवारांचा शिंदेंच्या आमदारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 12:57 IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांच्या छ. संभाजीनगर येथील कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.

छ. संभाजीनगर - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शिंदे गटातील आमदारांसाठी गेल्या वर्षभरापासून रखडलेला आहे. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर हा विस्तार होणारच असे म्हणत शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शरसाट व भरत गोगावले यांनी खात्रीदेखील दिली होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रेंगाळला. आता, अधिवेशन होऊनही दोन आठवडे झाले असून अद्यापही विस्ताराची कुठलीही चर्चा नाही. त्यातच, भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपद न मिळाल्याची पुन्हा एकदा नाराजी जाहीर केली. त्यासंदर्भात आमदार रोहित पवार यांना विचारलं असता, आता आमदारांनी आशाच सोडून दिल्याचं म्हटलं.  

छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांच्या छ. संभाजीनगर येथील कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी, माध्यम प्रतिनीधींच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदे गटातील आमदारांवर भाष्य केलं. 

ज्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये आपण बसलोय तिथेही एकजण इच्छुक आहेच ना, असे म्हणत नाव न घेता आमदार रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांना टोला लगावला. तसेच, अनेक आमदारांनी कपडे शिवले होते, कोणाचं वजन वाढलं म्हणून ते बसेनात. तर, काहींना जाळूनही टाकले असं आम्हाला समजलं. कारण, गेल्या महिन्याच्या २ तारखेनंतर सगळ्यांना कळलंय की, आता नवीन मंत्रीपदं मिळणार नाहीत, असे म्हणत आमदार पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तावर भाष्य केलं. तसेच, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर निशाणाही साधला. 

काय म्हणाले भरत गोगावले

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत, असे विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी येथे केले. एकाने पत्नी आत्महत्या करेल, दुसऱ्याने राजीनामा देतो, तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील, अशी गळ तीन आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घातली. त्यामुळे पेचात पडलेल्या मुख्यमंत्र्यांना संबंधित आमदारांना मंत्रिपद द्या असे सांगून मी आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहिल्याची खंत आमदार भरत गोगावले यांनी बोलून दाखवली. अलिबाग तालुक्यातील खानाव येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी बुधवारी आमदार गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार गोगावले यांनी  आपली खंत व्यक्त केली.