शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

१९ गावांत सौरपंप उभारणार

By admin | Updated: January 12, 2016 23:43 IST

हिंगोली : जिल्ह्यात नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेत १९ गावांत सौरपंप संच उभारणीस मंजुरी मिळाली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेत १९ गावांत सौरपंप संच उभारणीस मंजुरी मिळाली आहे. या प्रत्येक गावांत पाच लाखांच्या खर्च मर्यादेत पाणीपुरवठ्याची सोय केली जाणार आहे. वीज खंडित झाली तरी ग्रामस्थांची पाण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ही योजना आणली आहे. यामध्ये मागील काही वर्षांत जवळपास शंभरावर गावांमध्ये कामे झाली आहेत. यावर्षी यामध्ये अवघ्या १९ गावांचे उद्दिष्ट आले आहे. यात वसमत तालुक्यातील वाघी, अकोली त. चिंचोली, लिंगी, तुळजापूरवाडी, कोनाथा, टाकळगाव, कळमनुरी तालुक्यातील चाफनाथ, गिरामवाडी, बोल्डावाडी, चुंचा, शेनोडी, सेनगाव तालुक्यातील बेलखेडा, वडहिवरा, सिंनगी खांबा, रेपा, हिंगोली तालुक्यातील करंजळा, वडद, आमला, औंढा नागनाथ तालुक्यातील घारा दुधाळा या गावांचा समावेश आहे. या योजनेसाठी यापूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात ज्या गावामध्ये बोअरचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध आहे. पाणी पिण्यालायक आहे, अशांचीच निवड करण्यात आली होती. त्यांचे प्रस्ताव पाठविल्यानंतर त्या-त्या वर्षी त्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात येते. ही कामे मंजूर झालेल्या गावांत सौरपंप पॅनल, पाण्याची टाकी, दोन स्टँड पोस्ट आदी बाबींची उभारणी करण्यात येणार आहे. या गावांतील समित्यांना ही कामे कशा पद्धतीने करायची, याचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. ही कामे करताना मागच्या काही काळात गावांनी त्रुटी ठेवल्या होत्या. त्या गावांना अडचणीचा सामना करावा लागला. या गावांवर ही वेळ येणार नाही, याची काळजी या कार्यशाळेत घेतली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)