शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची हळवी बाजू ! बेघर कुटुंबाची परवड पाहिली; मायेची फुंकर घालत पाच भावंडांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 12:39 IST

The soft side of the Aurangabad Police : लॉकडाऊनमध्ये खोली सोडावी लागली व तेव्हापासून कुटुंब क्रांती चौकातील उड्डाणपुलाखालीच राहते.

ठळक मुद्देवडील किडनी विकाराने आजारी तर आई धुणीभांडी करतेचार मुली आणि एका मुलाच्या सुरक्षेचा प्रश्न होता

औरंगाबाद: पोट भरणेच ‌अवघड, त्यात कुणी भाड्याने घरही देत नसल्यामुळे क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली गेल्या तीन-चार महिन्यांपासून आईवडिलांसह राहणाऱ्या बेघर अल्पवयीन ५ बहीण-भावंडांना क्रांतीचौक पोलिसांनी सुरक्षित निवारा मिळवून देत गुरुवारी त्यांची रवानगी बालसंगोपनगृहात केली.

क्रांतीचौक पुलाखाली रमेश सोनवणे (वय ७०) हे पत्नी, दीड ते १२ वर्षे वयाच्या ४ मुली आणि ४ वर्षाच्या मुलासह राहतात. लॉकडाऊनपूर्वी हे कुटुंब कामाच्या शोधात औरंगाबादेत आले. सिल्लेखाना भागात ते भाड्याच्या खोलीत राहत होते. लॉकडाऊनमध्ये त्यांना ही खोली सोडावी लागली व तेव्हापासून हे कुटुंब उड्डाणपुलाखालीच राहते.

क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिता बागुल यांच्या नजरेस हे कुटुंब पडले. पुलाखाली उघड्यावर असे राहणे बालक आणि मुलींच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याचे त्यांनी त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी आम्ही घर भाड्याने शोधत आहोत, मात्र घर मिळत नसल्याचे सांगितले. बालकांची आई धुणीभांडी व एका मेसमध्ये पोळ्या लाटते. तर वडील रमेश दामोदर सोनवणे (रा. लखीमपूर, जिल्हा जळगाव) त्यांच्यासोबत थांबतात. सोनवणे हे देखिल आजारी असून त्यांच्या किडन्या निकामी झाल्या आहेत. आजारपण आणि उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने हतबल झालेल्या या कुटुंबाची मोठी परवड होत होती.  

मुस्कान मोहिमेअंतर्गत मिळाला निवारापोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक बागुल यांनी गुरुवारी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सुनील गायकवाड, कैलास पंडित, अन्नपूर्णा ढोरे यांना सोबत घेऊन सोनवणे कुटुंबातील ४ मुली आणि एक मुलगा यांना मुस्कान मोहिमेअंतर्गत बालकल्याण समितीसमोर हजर केले. समितीने सर्व परिस्थितीचा विचार करून या बालकांना बालसंगोपनगृहात ठेवण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस