शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Aurangabad Violence : औरंगाबादमध्ये कशामुळे उडाला हिंसाचाराचा भडका?; 'हे' आहे खरं काळजीचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 12:18 IST

महापालिकेनं गुरुवारी एका धार्मिक स्थळाची अनधिकृत नळजोडणी तोडल्यानंतर व्हॉट्स अॅपवरून काही मेसेज व्हायरल झाले होते.

औरंगाबादः अनधिकृत नळजोडणी तोडण्यावरून दोन गटांत वाद होतो आणि या ठिणगीचा वणवा संपूर्ण औरंगाबाद शहरात पसरतो, हे धक्कादायक आणि धोकादायकच म्हणावं लागेल. परंतु, हा हिंसाचार नळ कनेक्शन तोडल्यामुळे कमी आणि सोशल मीडियावरून अफवा पसरल्याने जास्त भडकल्याची चिंताजनक वस्तुस्थिती समोर येत आहे. त्यामुळे समाज जोडण्याच्या उद्देशानं सुरू झालेली समाजमाध्यमं जातीय तणावाला कारणीभूत ठरत असल्याचं दुर्दैवी चित्र कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर पुन्हा दिसतंय.

महापालिकेनं गुरुवारी एका धार्मिक स्थळाची अनधिकृत नळजोडणी तोडल्यानंतर व्हॉट्स अॅपवरून काही मेसेज व्हायरल झाले होते. आमची नळजोडणी तोडलीत, तर त्यांच्या धार्मिक स्थळाची का नाही, तीही अनधिकृत आहे आणि ती तोडायलाच हवी, अशी मागणी केली गेली. महापालिकेनं हे अनधिकृत कनेक्शनही शुक्रवारी तोडलं. त्यानंतर, सोशल मीडियावरून काही अफवा पसरवल्या गेल्या, जातीय द्वेष निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर, बघता बघता वेगवेगळ्या भागात जमाव रस्त्यावर उतरला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली, असं लक्षात येतंय. सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांमुळे या वादाचं लोण शहरभर पसरल्याचं राज्याचे मंत्री, आमदार आणि पोलीसही म्हणताहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक अत्यंत काळजीपूर्वक हाताळणं आणि त्यावरील पोस्टवर किती विश्वास ठेवायचा हे ठरवणं अत्यावश्यक झालं आहे. 

कोरेगाव-भीमा प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले होते. तेव्हाही, सोशल मीडियावरून बरेच उलसुलट मेसेज फिरले होते, समाजकंटकांकडून फिरवण्यात आले होते, अफवांनी गोंधळ वाढवला होता. म्हणूनच, यापुढे प्रत्येक मेसेजचा सारासार विचार करण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे.

दरम्यान, महापालिका अधिकारी अनधिकृत नळजोडणी तोडायला गेले तेव्हा त्यांच्यासोबत पोलिसांचा फौजफाटा का देण्यात आला नाही, असा प्रश्न खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांचा रोख गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांवर आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे या प्रकरणावरून येत्या काळात राजकारणही पेटू शकतं. 

औरंगाबादमध्ये नेमकं काय घडलं?   मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम महापालिका अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून सुरू केली होती. त्या दिवशी त्यांनी एका धार्मिक स्थळाचं कनेक्शन तोडलं होतं. त्यामुळे त्या धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळाची अनधिकृत नळजोडणी तोडण्याची मागणी केली. ती महापालिकेनं शुक्रवारी तोडली. त्यावरून हे दोन गट आमनेसामने आले आणि दगडफेक, तोडफोड, जाळपोळीच्या घटनांनी औरंगाबाद पेटलं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि नंतर गोळीबारही करावा लागला. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि पोलिसांसह अनेक जण जखमी झालेत. दुकानं, गाड्या जाळल्यामुळे आर्थिक नुकसानही मोठं झालंय. सध्या औरंगाबाद शहरात तणावपूर्ण शांतता असून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय.  

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारPoliceपोलिसSection 144जमावबंदी