शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत एसआरपी भरतीत बनवाबनवी; दोघे कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:12 IST

सातारा परिसरातील भारत बटालियन येथे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान बनवाबनवी करणाऱ्या दोन उमेदवारांचा चाणाक्ष अधिका-यांनी पर्दाफाश केला.

ठळक मुद्देव्हिडिओ ठरला पुरावा : निर्धारित अंतरापेक्षा अर्धेच अंतर पळून गुण मिळविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा परिसरातील भारत बटालियन येथे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान बनवाबनवी करणाऱ्या दोन उमेदवारांचा चाणाक्ष अधिका-यांनी पर्दाफाश केला. भरती प्रक्रियेचे चित्रण करणाºया व्हिडिओ कॅमे-यातही आरोपींची बनवाबनवी कैद झाली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोन्ही उमेदवारांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.रमेश शांताराम दांडगे (चेस क्रमांक २८६३, रा. दहिगाव, ता. सिल्लोड) आणि अमोल लुकड वाणी (चेस क्रमांक २८६५, रा. दहिगाव, ता. कन्नड) अशी आरोपी उमेदवारांची नावे आहेत. सातारा पोलिसांनी सांगितले की, सातारा परिसरातील भारत बटालियन या राज्य राखीव दलातील रिक्त पदासाठी पंधरा दिवसांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. १७ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान सहायक समादेशक मोहंमद इलियास मोहंमद सईद (५४) यांनी उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली. या मैदानी चाचणीदरम्यान उमेदवार रमेश दांडगे आणि अमोल वाणी यांच्यासह अन्य उमेदवारांचे धावण्याचे प्रात्यक्षिक घेतले.यावेळी रमेश आणि अमोल यांनी संगनमत करून बनवाबनवी केल्याचे निदर्शनास आले. यावेळी रमेशने पळण्याचे टोकन घेतल्यानंतर तो अडीच किलोमीटर पळाला आणि त्याने त्याचे टोकन आरोपी अमोल लुकड याला देऊन त्याला पुढील अंतर पळायला सांगितले. त्यानुसार अमोल हा रमेशच्या वतीने अडीच किलोमीटर अंतर पळून त्याने रमेशला गुण मिळवून दिले. हा प्रकार मात्र त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या अधिकाºयांच्या लक्षात आला नाही. मात्र त्या दिवशी आरोपीसोबत धावणाºया अन्य उमेदवारांना हा प्रकार माहीत असल्याने त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाºयांच्या कानावर घातली. त्यानंतर भरती प्रक्रियेतील भरती अधिकाºयांनी त्या दिवशी केलेले व्हिडिओ चित्रण तपासले.या चित्रणामध्ये आरोपींची बनवाबनवी त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही बाब आरोपींना कळू न देता त्यांना कार्यालयात बोलावून घेतले आणि याबाबत त्यांना जाब विचारला, तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलीस दलात येण्यासाठी बनवाबनवी करणाºया या जवानांचा पर्दाफाश झाल्याने सहायक समादेशक शेख यांनी त्यांच्याविरोधात शुक्रवारी सातारा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.पोलीस दलात नव्हे लॉकअपमध्येपोलीस दलात भरती होण्यासाठी बेईमानी करणे दोन्ही उमेदवारांना चांगलेच महागात पडले. सातारा ठाण्यातील पोहेकॉ. ढोले यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पोलीस दलात जाण्याचे स्वपे्न उराशी बाळगताना फसवणूक केल्याने त्यांना थेट लॉकअपमध्ये जावे लागले.