शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तस्करांची वाढती मुजोरी; महसूल पथकाच्या जीपवर घातले ट्रक्टर; कर्मचारी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 12:05 IST

पथकातील कर्मचारी जीपमधून खाली उतरलेले असल्याने या घटनेत जीवीतहानी झाली नाही.

पैठण ( औरंगाबाद ) : पैठण तहसीलच्या गौण खनिज प्रतिबंधक पथकाच्या शासकीय जीपला धडक मारून पळून जाण्याच्या प्रयत्नात अवैध मुरमाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरची ट्रॉली जीपवर पलटी झाल्याने जीपचे मोठे नुकसान झाले. पथकातील कर्मचारी जीपमधून खाली उतरलेले असल्याने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. सोमवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान ही थरारक घटना घडली असून अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला. या प्रकरणी रात्री पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.

पैठण परिसरात गौणखनिज तस्करांनी सध्या डोके वर काढले असून प्रशासनातील काही हस्तका कडून अभय मिळत असल्याने तस्करांची मगरूरी अलिकडे जास्तच वाढली आहे. यातूनच आज मुरूमाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर चालकाने शासकीय वाहनावर ट्रॅक्टर घालून पळून जाण्याचे आचरट धाडस केले. परंतु ट्रक्टर ट्रॉफी पलटी झाल्याने त्याचे धाडस अंगलट आले. पैठण तहसील कार्यालयाचे गौणखनिज प्रतिबंधक पथक शासकीय जीप घेऊन पैठण शेवगाव रोडवर गस्त घालत असताना पाटेगाव ग्रामपंचायत रोडने  मुरमाने भरून आलेले ट्रक्टर पथकातील मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, तलाठी लक्ष्मीकांत गोजरे, निलेश आहेर, दिपक नवगीरे, सतीश दळवे, गोपाळ वैद्य यांनी पाटेगाव फाट्यावर अडवले. यावेळी त्यांनी चालकाकडे रॉयल्टी बाबत चौकशी केली मात्र रॉयल्टी नसल्याचे त्याने सांगितले. ट्रक्टर त्यास तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले व पथकातील कर्मचारी जीप मध्ये बसणार तोच ट्रक्टर चालकाने ट्रक्टरसमोर असलेल्या जीपला धडक देऊन ट्रक्टर पळवून नेण्याचे धाडस केले. मात्र, धडक बसताच मुरमाने ओव्हरलोड भरलेली ट्रॉली जीपवरच उलटली. 

अचानक झालेल्या घटनेने पथकातील कर्मचारी मिळेल त्या दिशेला जीव वाचवून पळाल्याने बचावले. अन्यथा या घटनेत जीवीतहानी झाली असती असे तलाठी गोजरे यांनी सांगितले. दरम्यान गावकऱ्यांच्या मदतीने ट्रॉली सरळ करून ट्रक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या बाबत तहसील पथकाकडून पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून फरार झालेल्या ट्रक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

पोलीस पथकाशिवाय कारवाईगौणखनिज पथकाने पोलीस संरक्षण घेऊन रात्री कारवाई करावी असे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत मात्र तहसीलचे पथक पोलीसांना सोबत न ठेवताच कारवाई करतात. यामुळे असे प्रकार समोर येत आहेत. पथकाकडून पोलीस बंदोबस्त का टाळला जातो याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग