शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी बसला चार वर्ष पूर्ण; आतापर्यंत दीड कोटी औरंगाबादकरांनी केला प्रवास

By मुजीब देवणीकर | Updated: January 23, 2023 20:31 IST

शहर बससेवेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जाधववाडी परिसरात नवीन बसडेपो बांधण्यात येत आहे.

औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेला सोमवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने बससेवेचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आजपासून महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली.

प्रशासक, सीईओ डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनखाली सध्या ८० बस शहरातील विविध मार्गांवर धावत आहेत. आतापर्यंत बससेवेचा लाभ जवळपास दीड कोटी प्रवाशांनी घेतला. या काळात १५० बस स्थानक, ई-तिकीट, स्मार्ट कार्ड व अन्य सेवेचाही लाभ नागरिकांना मिळत आहे. शहर बससेवेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जाधववाडी परिसरात नवीन बसडेपो बांधण्यात येत आहे. शहरात जी-२० अंतर्गत वुमेन-२०चे प्रतिनिधी मंडळ भेट देणार आहे. या निमित्ताने महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याबाबत घोषणा होणार आहे, तसेच चालक व वाहक यांना सुरक्षा, अपघातांसंदर्भात सूचना करण्यात येणार आहे. बस विभागाचे प्रमुख राम पवनीकर व सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक ऋषिकेश इंगळे आदी काम पाहत आहेत.

३५ इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षाशहर बससेवेच्या पाचव्या वर्षी स्मार्ट सिटीतर्फे ३५ इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. या बस वातानुकूलित असतील आणि स्वच्छ हवेसाठी महत्त्वाच्या ठरतील. या संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बस थांब्यांचा प्रश्न कायमस्मार्ट सिटीने आतापर्यंत १५० बस थांबे उभारल्याचा दावा केला असून, त्यातील ६० टक्के बस थांब्यांवर कोणत्याही सुविधा नाहीत. चार प्रवासीही या स्थानकावर थांबू शकत नाहीत. बस थांबे दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत एकही बस थांबा दुरुस्त केलेला नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका