शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट शहरांना वाढीव निधी नाही; दोन हजार कोटी अतिरिक्त देण्याची घोषणा हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 19:14 IST

केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांनी १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील ८ स्मार्ट शहरांना अतिरिक्त २ हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

ठळक मुद्दे सध्या सुरू असलेल्या कामांना अंतिम स्वरूप देणे, निविदा प्रक्रियेतील कामे संपविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च २०२२ पर्यंत प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा यापूर्वीच केंद्राने दिला आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील ८ स्मार्ट शहरांना अतिरिक्त २ हजार कोटी रुपये देण्याची घोषणा अलीकडेच केंद्र शासनाने केली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरली आहे. राज्यातील एकाही स्मार्ट सिटी शहराला यासंदर्भात किती निधी देणार याचा तपशील देण्यात आलेला नाही. उलट सध्या सुरू असलेले, तसेच निविदा प्रक्रियेतील कामे मार्च २०२२ पर्यंत संपवा, असा तगादा केंद्र शासनाने लावला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांनी १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील ८ स्मार्ट शहरांना अतिरिक्त २ हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली. यासाठी राज्यस्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली होती. मात्र, मागील दहा दिवसांमध्ये राज्यातील एकाही स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनाला अतिरिक्त निधी किती दिला जाणार आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही घोषणाही हवेतच विरणार असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी केंद्राकडून अतिरिक्त निधी देण्यासंदर्भात कोणतीही सूचना, पत्रव्यवहार अद्यापपर्यंत झालेला नाही. उलट सध्या सुरू असलेल्या कामांना अंतिम स्वरूप देणे, निविदा प्रक्रियेतील कामे संपविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च २०२२ पर्यंत प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा यापूर्वीच केंद्राने दिला आहे. त्यामुळे आता अतिरिक्त निधी कशासाठी मिळेल, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. २०१५-१६ या आर्थिक वर्षात केंद्र शासनाला वेगवेगळ्या स्मार्ट शहरांनी आपले प्रकल्प अहवाल सादर केले. त्यानुसार केंद्राने सर्वांना ५० टक्के दिला आहे. २५ टक्के राज्य शासनाचा वाटा, २५ टक्के संबधित महापालिकांचा वाटा निश्चित करण्यात आला आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आम्हाला अद्याप कोणतीही पूर्वसूचना नाहीकेंद्र शासन राज्यातील ८ शहरांना अतिरिक्त निधी मिळणार असल्याचे वर्तमानपत्रातच वाचले. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतीही पूर्वसूचना आतापर्यंत देण्यात आलेली नाही. केंद्राकडून कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. प्रकल्प आराखड्यानुसार केंद्र, राज्याने आतापर्यंत निधी दिला आहे. अतिरिक्त निधीतून कोणती कामे करणार, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.- अरुण शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटी