शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय खरेदीची संथगती; नोंदणी केलेला शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस विकून मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 19:30 IST

पैठण तालुक्यातील ११७३ शेतकऱ्यांनी कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विक्री केला

ठळक मुद्दे४२३०  शेतकऱ्यांनी कापूस विक्री साठी नोंदणी केली होतीपावसाचे आगमन व शासकीय कापूस खरेदीची संथगतीचे कारणकापूस पडताळणी मोहिमेतून समोर आली माहिती

पैठण : कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्री करण्यासाठी नोंदणी करणाऱ्या पैठण तालुक्यातील ११७३ शेतकऱ्यांनी कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विक्री केला असल्याची माहिती कापूस पडताळणी मोहिमेतून समोर आली आहे.

पावसाचे झालेले आगमन व  शासकीय कापूस खरेदीची संथगती लक्षात घेता कापूस घरात ठेवण्याचा धोका न पत्करता खाजगी व्यापाऱ्याच्या पारड्यात कापसाचे माप टाकून बळिराजा मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशानुसार पैठण तालुक्यात करण्यात आलेल्या कापूस पडताळणी मोहिमे अंती आता फक्त ७२६ शेतकऱ्यांचा २५२६८ क्विंटल कापसाची खरेदी शिल्लक राहिली आहे. 

पैठण कृषि उत्पन्न बाजार समितीकडे एकूण ४२३०  शेतकऱ्यांनी कापूस विक्री साठी नोंदणी केलेली आहे . त्यापैकी कापूस विक्री केलेल्या तसेच दुबार नोंदणी केलेल्या १२८१  शेतकऱ्यांची संख्या वजा जाता पैठण तालुक्यातील १८९९  शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची प्रत्यक्ष गावात जावून १ ते ७ जून दरम्यान ग्रामसेवक , तलाठी तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव आदीच्या पथकाने पडताळणी केली. या पडताळणीत तब्बल ११७३ शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकल्याचे समोर आले आहे. 

१०५० शेतकरी ईतर तालुक्यातीलपैठण बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या इतर तालुक्यातील १०५० शेतकऱ्यांच्या यादया संबंधित तालुक्याकडे  पडताळणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.  १८९९ शेतकऱ्यांपैकी ११७ शेतकऱ्यांकडे कापूस तपासणी तारखेवर शिल्लक नसल्याने सदर शेतकऱ्यांची नांवे वगळण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. शासनाच्या कापूस पडताळणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या नावावर उखळ पांढरे करून घेण्याऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. उर्वरित कापूस खरेदी शासनाचे पुढील आदेश येताच सुरू करण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती