शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दरवाजात झोपलेला प्रवासी धावत्या रेल्वेतून पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:12 IST

मोबाईलवरून गाणे ऐकत झोपी गेलेला २१ वर्षीय युवक बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली. रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच तो स्वत: ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अविनाश उत्तम पारगणे (२१, रा. नेवरी, जि.नांदेड) असे या किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देसुदैवाने बचावला : पोलीस शोध घेत असतानाच हजर झाला पोलीस ठाण्यात

औरंगाबाद : मोबाईलवरून गाणे ऐकत झोपी गेलेला २१ वर्षीय युवक बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली. रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच तो स्वत: ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अविनाश उत्तम पारगणे (२१, रा. नेवरी, जि.नांदेड) असे या किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.नागपूर-मुंबई नंदीग्राम (११४०२) एक्स्प्रेसच्या एस-९ डब्याच्या दरवाजात बसून अविनाश पारगणे हा प्रवास करीत होता. औरंगाबाद स्थानकावर ९ वाजून ५० मिनिटांनी हे रेल्वे दाखल झाली. रेल्वेने ९ वाजून ५५ मिनिटांनी औरंगाबाद स्थानक सोडले. अविनाश मोबाईलवर गाणे ऐकत दरवाजात बसलेला असतानाच झोपी गेला. स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे गेल्यानंतर झोपेत अविनाशचा तोल गेला व तो खाली पडला. सुदैवाने हा अपघात त्याच्या जिवावर बेतला नाही. रेल्वे सेना अध्यक्ष संतोष सोमाणी यांना ही माहिती कळाली. त्यांनी रेल्वे व लोहमार्ग पोलिसांना कळविले. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल तात्काळ घटनेच्या दिशेने गेले. पण किरकोळ जखमी झालेला अविनाश रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. यात लोहमार्ग पोलीस निरीक्षक दिलीप साबळे, सहायक निरीक्षक सागर गोडे, रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक अरविंद शर्मा, कसबे, दिलीप कांबळे, कॉन्स्टेबल खान, सय्यद जफर आदींनी प्रयत्न केले..............................रेल्वे डब्याच्या दरवाजात बसून प्रवास न करण्याचे वारंवार आवाहन प्रवाशांना केले जाते. तरीही प्रवासी दरवाजात बसूनच प्रवास करतात. म्हणूनच लोहमार्ग पोलिसांकडून सोमवारपासून दरवाजात बसून प्रवास करणाºयांविरुद्ध मोहीम राबविली जाणार आहे.- दिलीप साबळे, निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, औरंगाबाद.

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासी