शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कुलगुरूंच्या वाहनचालकासह १६ जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 19:32 IST

विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी येत असताना, नियमांचे पालन केले जात असतानाही कोरोना होत आहे. या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे. 

ठळक मुद्देविद्यापीठात आठ दिवसांच्या लॉकडाऊनपूर्वीच कोरोनाने शिरकाव केला होता.लॉकडाऊननंतर कोरोनाचा विळखा विद्यापीठाला पडला आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरूंच्या वाहनचालकासह १६ अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सव्वालाख विद्यार्थ्यांची परीक्षा या काळात कशी घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे. 

विद्यापीठात आठ दिवसांच्या लॉकडाऊनपूर्वीच कोरोनाने शिरकाव केला होता. दोन प्राध्यापक पॉझिटिव्ह आढळले होते. लॉकडाऊननंतर कोरोनाचा विळखा विद्यापीठाला पडला आहे. एका उपकुलसचिवांसह काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची कोविड-१९ ची तपासणी केली असता पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याशिवाय कुलगुरूंच्या वाहनचालकासह इतर एक वाहनचालक पॉझिटिव्ह आढळला आहे. आतापर्यंत विद्यापीठात एकूण १६ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मात्र, विद्यापीठ प्रशासनाने त्यास दुजोरा दिला नाही. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन प्राध्यापकांसह एक अधिकारी आणि इतर काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगितले, तसेच विद्यापीठ परिसर, मुख्य प्रशासकीय इमारत आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.  याशिवाय तापमान तपासणी, सॅनिटायझर उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी कामावर येत आहेत. ज्याच्या टेबलवर काम आहे असे लोक येऊन काम करून जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी महापालिकेला अर्ज पाठवून विद्यापीठातील सर्वच कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्याची विनंती केली जाणार असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी येत असताना, नियमांचे पालन केले जात असतानाही कोरोना होत आहे. या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे. 

कुलपती, कुलगुरू असुरक्षित, तिथे विद्यार्थ्यांचे काय होणार विद्यापीठाचे कुलपती राहत असलेल्या राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाला. आता विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या वाहनचालकाला कोरोना झाला. कुलपती, कुलगुरू सुरक्षित राहू शकत नाहीत, त्याठिकाणी कोणत्याही सुविधा नसणारा विद्यार्थी कसा सुरक्षित राहील. कुलपतींनी तर मुंबई सोडून नागपूरला मुक्काम हलवला आहे. त्यांना स्वत:ची काळजी वाटते. मग विद्यार्थ्यांची काळजी कोण घेणार आहे. - डॉ. नीलेश आंबेवाडीकर, प्रवक्ता, युवक काँग्रेस

युजीसी, कुलपतींनी विचार करावाविद्यापीठात सध्या १५ टक्के कर्मचारी कामावर येत आहेत. त्यातील १६ जणांना बाधा झाली. कामावर येणारे १०० पेक्षा कमी कर्मचारी सुरक्षित राहू शकत नाहीत, तर एकाच वेळी सव्वालाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यास ते कसे सुरक्षित राहतील, याचा विचार युजीसी, कुलपती यांनी केला पाहिजे. - डॉ. तुकाराम सराफ, विद्यार्थी सेना 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद