शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

सहा वर्षे झाली, सिडकोचे लीज होल्डचे फ्री होल्ड होईना; 'तो' निर्णय चुनावी जुमलाच होता का?

By विकास राऊत | Updated: March 12, 2024 13:09 IST

सिडको बरखास्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा पाठपुरावा

छत्रपती संभाजीनगर : शहरात सिडकोने विकसित केलेल्या वसाहती ९९ वर्षांच्या भाडेकरारावरून मालकी हक्कावर करून देण्याचा निर्णय १९ डिसेंबर २०१८ रोजी शासनाने घेतला परंतु त्या निर्णयाचे फायदे अजूनही सिडकोवासीयांना मिळत नसल्याचे दिसते आहे. सिडको प्रशासनाने या निर्णयानंतर शासनाला पाठविलेल्या ठरावात त्रुटी आढळल्या असून तो ठराव प्रशासनाकडे आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लीज होल्ड टू फ्री होल्डचा मुद्दा ऐरणीवर आला असून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होणार, याबाबत नागरिक आणि सिडको प्रशासन सध्या संभ्रमात आहे.

लीज होल्ड टू फ्री होल्ड करण्यासाठी १ मार्च २००६ पासून नागरिक मागणी करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या मागणीसाठी शासनाचे उंबरठे झिजविले. १२ वर्षाच्या लढ्यानंतर म्हणजेच २०१८ साली सिडकोवासीयांना भाडेकराराच्या मालमत्तेचा मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला परंतु तो निर्णय ‘चुनावी जुमला’च ठरला.

३० ऑक्टोबर १९७२ साली नवीन छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासाकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती झाली. सुमारे १ हजार १२ हेक्टर क्षेत्रफळावर वसाहतींची निर्मिती करण्यात आली आहे. परवडणाऱ्या घरांच्या धेारणासाठी सिडकोने अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटांकरिता २१,०१२ घरकुले बांधली. सर्व सुविधांची निर्मिती करून सिडकोने १ एप्रिल २००६ रोजी मालमत्ता व परिसर महानगरपालिकेकडे १५ कोटींत सुपूर्द केला.

शहरात सिडकोच्या मालमत्ता...

सिडकोची शहरात २१ हजार १२ घरकुले,आर्थिकदृष्ट्या दुर्बल १३ हजार ९२९ घरे बांधली,अल्प उत्पन्न गटासाठी ५ हजार १४२ घरे बांधली,मध्यम उत्पन्नासाठी १६०० घरे बांधली,उच्च उत्पन्न गटासाठी ४५० घरे बांधली,१३ योजनांमध्ये सुमारे ९ हजार भूखंड विक्री,सर्व मिळून सिडकोच्या सुमारे ३२ हजार मालमत्ता,

वाळूजमध्ये अल्प मध्यम उत्पन्न गटासाठी ९३५ घरे, त्यापरिसरात २५०० भूखंडांची विक्री,वाळूज महानगर १ ते ८ पैकी ३ प्रकल्पांसाठी काम केले.वाळूजमधील नवीन भूसंपादनातून सिडकोचा काढता पाय.

ठराव पाठविला होता...लीजहोल्डचे फ्री होल्ड करण्यासाठी शासनाकडे ठराव पाठविला होता. त्या ठरावात काही बदल करण्याच्या सूचनांसह तो परत आला आहे.- भुजंग गायकवाड, प्रभारी प्रशासक सिडको.

सिडको बरखास्त करण्यासाठी पाठपुरावापुर्व मतदारसंघात सिडकोच्या वसाहती आहेत. सिडकोचे शहरात काही काम राहिलेले नाही. त्यामुळे येथून सिडको बरखास्त करण्यात यावे. या मागणीसाठी पाठपुरावा सुरू आहे. येत्या काही महिन्यांत यावर निर्णय होईल. अशी अपेक्षा आहे.-अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री

मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजेनगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लीज होल्ड टू फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या या प्रकरणाची संचिका त्यांच्याकडेच आहे. त्यांनी तातडीने निर्णय घेतला पाहिजे. तसेच येथून सिडको बरखास्त केले पाहिजे.-विश्वनाथ स्वामी, शहरप्रमुख ठाकरे गट

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcidcoसिडको