हिंगोली : विशेष पडताळणी मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सहा माध्यमिक शाळांनी प्रत्यक्षातील विद्यार्थ्यापेक्षा जास्त पटसंख्या दर्शवून शासनाच्या विविध योजना- अनुदान अनुज्ञेय नसताना त्याचा फायदा घेतला असल्याचे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी जाहीर केले आहे. या संदर्भातील राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत विद्यार्थी उपस्थितीबाबत घेण्यात आलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेच्या आधाराव तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदीचे पालन न करणार्या शाळांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १४ फेब्रुवारी २०१४ रोजी दिलेल्या निर्देशानुसार अशा शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा येथील महाराष्टÑ महाविद्यालय (अनुदानित), राष्टÑमाता इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, खटकाळी ता. हिंगोली (विना नुदानित), सह्याद्री इंग्लिश स्कुल, वसमत (कायम विना अनुदानित), हुरूनिसा उर्दू माध्यमिक विद्यालय, आखाडा बाळापूर (विना अनुदानित), महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, चिंचोली, ता. हिंगोली (विना अनुदानित), कोणार्क विद्यालय कनका ता. हिंगोली (विनाअनुदानित) या शाळांचा समावेश आहे. विशेष पटपडताळणीमध्ये या शाळांनी प्रत्यक्षातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त पटसंख्या दर्शवून शासनाच्या विविध योजना- अनुदान अनुज्ञेय नसताना त्याचा फायदा घेतला. तसेच बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ मधील शाळा मान्यतेच्या निकषांची पूर्तता केली नाही, असेही शिक्षण संचालक जाधव यांदी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या शाळा व्यवस्थापनाविरुद्ध आरटीई २००९ मधील तरतुदी, महाराष्टÑ शैक्षणिक संस्था अधिनियम १९७१, १९७६ तसेच प्रचलित नियमानुसार आवश्यक ती कारवाई प्रचलित असल्याचेही जाधव यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)शिक्षण संचालकांनी जाहीर केलेल्या शाळांमध्ये हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथील महाराष्टÑ विद्यालय, खटकाळी ता. हिंगोली येथील राष्टÑमाता इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, वसमत येथील सह्याद्री इंग्लिश स्कुल, आखाडा बाळापूर येथील हुरूनिसा उर्दु माध्यमिक विद्यालय, चिंचोली ता. हिंगोली येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय तसेच कनका येथील कोर्णाक विद्यालयाचा समावेश. ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत घेण्यात आलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेत या सहा शाळांनी प्रत्यक्षातील विद्यार्थी संख्येपेक्षा जास्त पटसंख्या दाखविल्याचे झाले उघड बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील शाळा मान्यतेचे निकषही करण्यात आले नाही पूर्ण उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या शाळांची नावे शिक्षण विभागाने केली जाहीर.
जास्त पटसंख्या दाखविणार्या सहा शाळा
By admin | Updated: June 1, 2014 00:28 IST