जालना : नुतन वसाहत उड्डाणपुलाखाली एका दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून, लाथाबुक्क्याने व काठीने मारहाण करून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सहा आरोपींना शनिवारी अटक केली. त्यांच्या ताब्यातून २ लाख २० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.२ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास एक दाम्पत्य मोटारसायकलवरून जात असताना दरोडेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्याजवळील ऐवज लुटला. पोलिसांनी याप्रकरणी शेख मजहर शेख इब्राहिम (रा. लक्ष्मीनारायणपुरा), शेख वसीम शेख सलीम (गांधीनगर), सय्यद वसीम स. अब्बास (गांधीनगर), शेख कलीम शेख शरीफ (वाल्मिकनगर) आणि इम्रान रफिक पठण (गांधीनगर) या आरोपींना अटक केली. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक सुरेश भाले, स्टाफचे कैलास कुऱ्हेवाड, अंबादास साबळे, गजानन भोसले, धनंजय कावळे, साई पवार, सचिन चौधरी, दीपक पाटील, नामदेव राठोड, रामदास जाधव यांनी ही कारवाई केली.
वाटमारी प्रकरणातील सहा जण अटकेत
By admin | Updated: February 8, 2015 00:09 IST