शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

भावजयीस मारहाण प्रकरण: शिवसेना आ. बोरनारेंवरील कारवाईचा अहवाल महिला आयोगाने मागविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 12:19 IST

भावजयीस मारहाण प्रकरण : राज्य महिला आयोगाचे ग्रामीण पोलिसांना आदेश

औरंगाबाद : वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या भावजय आणि चुलत भावाला मारहाण केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून असे कृत्य होणे हे अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आ. बोरनारेंवर योग्य ती कारवाई करून त्याचा अहवाल तीन दिवसांत राज्य महिला आयोगास सादर करावा, असे आदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शनिवारी दिले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार केल्याचा राग मनात धरून शिवसेना आ. रमेश बोरनारे यांच्यासह १० जणांनी चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीला शुक्रवारी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात आ. बोरनारेंसह १० जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भावजयीला मारहाण केल्याचे छायाचित्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. या व्हायरल छायाचित्रांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी तत्काळ दखल घेत घटनेचा निषेध नोंदवला. तसेच तीन दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल आयोगाला सादर करण्याचे आदेश ग्रामीण पोलिसांना दिले. आ. बोरनारेंसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे खासगी सचिव रामदास वाघ यांनी मारहाण झालेल्या जयश्री दिलीप बोरनारे (रा. सटाणा) यांच्याविरोधात जातिवाचक शब्द वापरल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून वैजापूर पोलिसांनी जयश्री बोरनारे यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

...तर बोरनारेंना रस्त्यावर फिरू देणार नाहीशिवसेना आ. बोरनारे यांचे वर्तन अशोभनीय आहे. त्यांनी तत्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा भाजपच्या राज्य महिला आघाडीच्या रेखा कुलकर्णी, सविता कुलकर्णी, जि.प. सदस्या पुष्पा काळे, माधुरी अदवंत यांनी वैजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तसेच तक्रारदार महिलेच्या विरोधात दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची मागणीही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी एकनाथ जाधव, कल्याण दांगोडे, डॉ. राजीव डोंगरे, कैलास पवार, मोहन आहेर आदींची उपस्थिती होती.

ग्रामीण पोलिसांवर राजकीय दबाव का?सत्ताधारी असलेल्या शिवसेना आ. बाेरनारे यांच्यासह सहकाऱ्यांनी भावजयीला बेदम मारहाण केली. या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी किरकोळ कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सदरील महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य आरोपींनी केल्याचा दावा संबंधितांनी केला आहे. तरीही पोलिसांनी विनयभंगासह १० जण असल्यामुळे दरोड्याचेही कलम लावले नाही. आठ तासांच्या ठिय्या नंतर शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल होताच त्यांच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीवरून मारहाण झालेल्या महिलेच्याच विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्याची तत्परता मात्र ग्रामीण पोलिसांनी दाखवली. आ. बोरनारे यांच्यासह गुन्हा नोंदविलेल्या आरोपींना वैजापूर पोलिसांनी दोन दिवस झाले तरी नोटीसही दिलेली नाही. याविषयी वैजापूरचे निरीक्षक समरसिंग राजपूत यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

पीडितेवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हाशिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचे शिवसेना आ. रमेश बाेरनारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. गुन्हा दाखल, पण कारवाई शून्य. उलट पीडितेवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. यावर महिलाधोरणकर्ते काही बोलणार का? अजून किती बलात्कारी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार आहात मुख्यमंत्री? महाराज असते तर कडेलोट केला असता हो या सरकारचा. हे सरकार गोरगरीब धार्जिणे नाही, तर सरकारचे कलाकारी मंत्री, आमदार, खासदार व त्यांचे बगलबच्चे यांचे धार्जिणे आहे.- चित्रा वाघ, उपाध्यक्ष, राज्य भाजपा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना