शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दबंग अधिकारी केंद्रेकरांचा साधेपणा; पत्नीसह बाजार करतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल

By सुमेध उघडे | Updated: January 16, 2021 14:09 IST

शेतकरी कुटुंबातील केंद्रकर यांच्या याच स्वभावाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे.

औरंगाबाद: दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेले मराठवाडा विभागीय  आयुक्त सुनील केंद्रकर पुन्हा एकदा त्यांच्या साधेपणामुळे चर्चेत आले आहेत. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील खुलताबाद येथील आठवडी बाजारात केंद्रेकर हे पत्नीसह जाऊन स्वतः बाजार करत असलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठवाडा विभागीय आयुक्त असलेले सुनील केंद्रकर यांचा प्रशासनात दरारा आहे. कडक शिस्त आणि सर्वसामान्यांसाठी बेधडक निर्णय घेत असल्याने त्यांची दबंग अधिकारी म्हणून ओळख आहे. मात्र, या सर्वात त्यांचा साधेपणाही अनेक वेळा दिसून आला आहे. शेतकरी कुटुंबातील केंद्रकर यांच्या याच स्वभावाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. अधिकारी असतानाही कसलाही बडेजाव न करता सर्वसामान्यांसारखे बाजार करताना ते दिसून आले आहेत. 

जिल्ह्यातील खुलताबाद येथे शनिवारी सकाळी पत्नीसह फेरफटका मारण्यासाठी सुनील केंद्रेकर गेले होते. यावेळी त्यांनी तेथील आठवडी बाजाराला भेट दिली. कसलाही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने त्यांनी थेट पत्नीसह बाजारात भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी बाजार केला. हे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले असून केंद्रेकर यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

निसर्गात, वनात आणि शेतात रमणारा अधिकारी विभागीय आयुक्त केंद्रेकर हे निसर्गात, वनात आणि शेतात रमणारे म्हणून परिचित आहेत. अधिकारी म्हंटल की नेहमी एसी कार्यालय, अलिशान गाड्या, हाताखाली नोकर-चाकर असे चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळत. याला आयुक्त केंद्रेकर हे अपवाद ठरत आहेत. यापूर्वीसुद्धा केंद्रकर गुलशन महल येथे हातात कुंदळ घेऊन काम करतान दिसले होते. तेथील वन त्यांनी  स्वतः जातीने लक्ष देत फुलविले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय