लातूर : गणेशोत्सव आणि लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रीकल्स साहित्याची दुकाने लातूर शहरात व्यापाऱ्यांनी थाटली आहेत. विद्युत रोषणाईबरोबरच विविध आकर्षक देखाव्यांसाठी लागणारे साहित्य व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवले आहेत. आता सजावटींच्या बाजारात ड्रॅगनने चलती आहे. परिणामी, मेड इन चायनाच्या वस्तूंना ग्राहकांतून मोठी मागणी आहे. स्वस्त व आकर्षक चायना साहित्याची ग्राहकांत दिवसेंदिवस क्रेझ वाढत आहे.लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीर, निलंगा, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, देवणी आदी शहरात इलेक्ट्रिकल्सची दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली आहेत. या दुकानात मोठ्या प्रमाणावर सजावटी आणि विद्युत रोषणाईचे विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रातील बहुतांश साहित्यावर मेड इन चायनाचा प्रभाव आहे. अल्प किंमतीत आकर्षक सजावटींचे साहित्य मिळू लागल्यामुळे ग्राहकांची गर्दी होत आहे.(प्रतिनिधी)
सजावटींच्या बाजारात ‘ड्रॅगन’ची अशीही चलती
By admin | Updated: August 29, 2016 00:57 IST