शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

‘खेलो इंडिया’ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतीक्षा सणसला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:40 AM

औरंगाबादची प्रतिभावान अ‍ॅथलिट प्रतीक्षा सणस हिने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’च्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला. प्रतीक्षाने हे रौप्यपदक महाराष्ट्राला ४ बाय १00 रिलेत जिंकून दिले. महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून देण्यात प्रतीक्षा सणस हिच्यासह आभा साळुंखे, चार्वरी पुजारी, अवंतिका नारळे यांचा समावेश होता.

औरंगाबाद : औरंगाबादची प्रतिभावान अ‍ॅथलिट प्रतीक्षा सणस हिने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’च्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला. प्रतीक्षाने हे रौप्यपदक महाराष्ट्राला ४ बाय १00 रिलेत जिंकून दिले. महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून देण्यात प्रतीक्षा सणस हिच्यासह आभा साळुंखे, चार्वरी पुजारी, अवंतिका नारळे यांचा समावेश होता. औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनीत असणाºया प्रतीक्षा सणस हिला प्रशिक्षक सुरेंद्र मोदी आणि पूनम नवगिरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रतीक्षा सणस हिने याआधी अनेक राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेती कामगिरी केली आहे.तिने २0१४ मध्ये विशाखापट्टणम येथील आंतरजिल्हा राष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकले होते. २0१५-१६ मध्ये केरळ येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत ४ बाय १00 रिलेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. २0१५ मध्ये तिने पुणे येथे राज्यस्तरीय फेडरेशन स्पर्धेत ट्रायथलॉनमध्ये प्रथम आणि सबज्युनिअर गटातील लांबउडीत रौप्यपदकाची कमाई केली. २0१६ मध्ये तिने पुणे येथे सबज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत लांब उडीत गोल्डन कामगिरी केली. २0१७ मध्ये भोपाळ येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत तिने ४ बाय १00 रिलेत कास्यपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला. या यशाबद्दल तिचे क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे आदींनी अभिनंदन केले आहे.