छत्रपती संभाजीनगर : शहरात सर्पमित्राच्या नोंद वनविभागाकडे असल्या तरी ते स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सापाला पकडून नेतात. संबंधितांकडे सर्पमित्राने पैसे मागितले की, नाममात्र रक्कम कलेची दाद म्हणून त्यांना देतात. पण सर्पमित्रांना किती रक्कम द्यावी, असे काहीही ठरलेले नाही. साप निघाला की प्रत्येकाची एकच धांदल उडते. मग वाटेल ती किमत देण्यासही अनेकजण तयार होतात.
शहरात २० सर्पमित्रांची नोंदवनविभागात २०पेक्षा अधिक सर्पमित्रांची नोंद आहे. हे सर्पमित्र आपला जीव धोक्यात घालून सापाला पकडून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडतात.
साप दिसला तर सर्पमित्राला करा फोनसाप दिसला तर त्यास मारू नका. सर्पमित्रांना तत्काळ फोन करून माहिती देणे अनिवार्य आहे. वनविभागाच्या टोल फ्री नंबर काॅल केल्यास ते घटनास्थळी येऊन सापाला पकडून नेतात.
सर्पमित्राला पैसे द्यावेत का?सर्पमित्र स्वत:च्या हिमतीवर तो साप पकडून नेतो, त्या बदल्यात पैसे द्यावे लागतात. पण काहीजण फक्त इंधनाचा खर्च देतात.
वनविभागाचे कर्मचारी नव्हेत...वनविभागाकडे सर्पमित्राची फक्त नोंद असून, त्यांचा स्वत:चा तो छंद असतो. साप पकडल्यानंतर ते वनविभागाकडे नोंद करतात, ज्यांच्याकडे साप निघाला ते फोन करून त्याला बोलावून घेतात. ज्यांनी बोलावले, तेच पैसे देतात. परंतु पैशासाठी अडून बसणे किंवा हा साप परत सोडून देईन, अशी धमकी देऊन पैसे मागणे योग्य नाही. त्यावर कारवाई होऊ शकते.- शशिकांत तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी
सर्पमित्रांचा विमा तरी काढावा...स्वत:चा जीव धोक्यात घालून ते काम करतात. काही दुर्घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबाला तरी भरपाई मिळावी त्यासाठी वनविभागाने मानधन नव्हे तर किमान विमा तरी काढून द्यावा.- डॉ. किशोर पाठक