शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सर्विस रोडवर अतिक्रमण केलेल्या दुकानमालकांची लाखोंची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 19:53 IST

दहा हजार भाडे, पाच लाख अ‍ॅडव्हान्स

ठळक मुद्देही दुकाने वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर दिली होती. अतिक्रमित जागेवर फुकट बसून लाखो रुपये कमावले

औरंगाबाद : बीड बायपास रोडवर निष्पाप नागरिकांचे दररोज रक्त सांडत असताना काही नागरिकांनी सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून ठेवली आहेत. काही नागरिकांनी सर्व्हिस रोडवर पक्की दुकाने दहा ते बारा वर्षांपूर्वी बांधली होती. एका दुकानदाराकडून दहा हजार रुपये दरमहा भाडे आणि पाच लाख रुपये अ‍ॅडव्हान्सही घेण्यात येत होते. मागील काही वर्षांमध्ये दुकानमालकांनी लाखो रुपयांची कमाई केल्याचे देवळाई चौकातील काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

देवळाई चौकात एकाच व्यक्तीची असंख्य दुकाने होती. ही दुकाने वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर दिली होती. चप्पल, हार्डवेअर, मोबाईल शॉपी, प्लायवूड, कार्पेट विक्रेता आदींना ही दुकाने दिली होती. अनेक भाडेकरून आठ ते दहा वर्षांपासून या चौकात व्यवसाय करीत होते. अचानक दुकान तोडण्यात आल्याचे दु:ख व्यापाऱ्यांना अजिबात नव्हते. कारण दुकान आमच्या मालकीची नसून आम्ही तर भाडेकरू आहोत, असे अनेकांनी सांगितले. आमच्या सामानाचे नुकसान टाळण्यासाठी काही वेळ द्या, दुकान रिकामे करून देऊ, अशी विनंती व्यापाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे केली. मनपा कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांंना दुकानांचे शटर काढून घ्या, कशाला नुकसान करून घेता, असे सांगितले. भाडेकरू दुकानदार म्हणाला, दुकानमालकाकडे एवढी गडगंज संपत्ती आहे की, असे शंभर शटर तुटले तरी काही किंचितही फरक पडणार नाही. ज्या व्यापाऱ्यांनी तातडीने मंगळवारी दुकाने रिकामी केली त्यांनी आता पर्यायी आणि पक्की दुकाने शोधण्याचे काम सुरू केले. सहजासहजी पर्यायी जागा त्यांना मिळणार नाही. 

मोबदला कशासाठी द्यावा...सर्व्हिस रोडच्या शासकीय जागेवर अगोदरच नागरिकांनी अतिक्रमणे करून अनेक दुकाने थाटली आहेत. आता जागा रिकामी करून देण्याचा मुद्दा आल्यावर जागेचा मोबदलाही अनेक जण मागत आहेत. ज्या अतिक्रमित जागेवर फुकट बसून लाखो रुपये भाडेपट्टा वसूल केला त्यांना मावेजा कोठून देणार, असा प्रश्नही मनपा अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

साईड पंखे कोणी भरावेतबीड बायपास रोड सध्या ६० फूट रुंद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने किमान ५ फूट कच्चा रस्ता आहे. डांबरी रस्त्यावरून दुचाकी कच्च्या रस्त्यावर आणताना अनेकदा अपघात होत आहेत. कच्च्या रस्त्यामधील साईड पंखे नॅशनल हायवे, सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरी पद्धतीने भरले तर अपघाताच्या प्रमाणात घट होईल, असा अंदाज मनपा अधिकाऱ्यांनी वर्तविला.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाhighwayमहामार्ग