शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तिचे सारथ्य लांबणीवर ! महिलांच्या हाती दिले जाणारे एसटीचे स्टिअरिंग केले 'जाम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 16:13 IST

प्रशिक्षणच थांबविले : औरंगाबादेत सुरू होते ३२ महिलांचे प्रशिक्षण 

ठळक मुद्दे३ फेब्रुवारी २०२० पासून त्यांचे औरंगाबादेत प्रशिक्षणही सुरूमहामंडळाने १७ जुलै रोजी एका पत्राद्वारे प्रशिक्षण थांबविण्याचे कळवले

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : एसटी महामंडळात मोठा गाजावाजा करून महिला चालक दाखल होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यात आली. प्रशिक्षणही सुरू करण्यात आले. परंतु कोरोनाच्या नावाखाली महिलांच्या हाती दिले जाणारे 'एसटी'चे स्टिअरिंगच 'जाम' करण्यात आले आहे.

औरंगाबादेत सुरू असलेल्या ३२ महिलांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले आहे. औरंगाबाद आणि नाशिक प्रदेशासाठी चालकपदासाठी ३२ महिलांची निवड करण्यात आली. यात औरंगाबाद विभागतील ६ महिलांचा समावेश आहे. ३ फेब्रुवारी २०२० पासून त्यांचे औरंगाबादेत प्रशिक्षणही सुरू करण्यात आले होते. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर या सर्व महिला एसटी चालक म्हणून रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले. एसटी महामंडळाने १७ जुलै रोजी एका पत्राद्वारे सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहायक, लिपिक-टंकलेखक, राज्यसंवर्ग व अधिकारी पदांमध्ये आणि अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचे प्रशिक्षण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याची सूचना विभाग नियंत्रकांना केली. त्यानुसार औरंगाबादेत प्रशिक्षण थंबविण्यात आले आहे. ही केवळ तात्पुरती स्थगिती असल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. त्यामुळे एसटी महामंडळात ती’च्या हाती ‘एसटी’चे सारथ्य येणे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या महिला चिंतेत प्रशिक्षण पुन्हा कधी सुरू होईल, याची कोणतीही माहिती दिली जात नाही. काही कालावधीनंतर झालेली निवडच रद्द होण्याची आणि त्यातून एसटीत चालक म्हणून रुजू होण्याच्या स्वप्नांनावर पाणी फेरले जाण्याची भीती निवड झालेल्या महिला उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. 

आधी गाजावाजा, आता अन्याय

मोठा गाजावाजा करून महिला चालक नेमण्यात येत असल्याचे सांगितले. परंतु त्यासाठी सुरू असलेले प्रशिक्षणच बंद करण्यात आले. हा एकप्रकारे अन्याय आहे. प्रशिक्षण तात्पुरते स्थगित केल्याचे सांगितले जाते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महिलांनी चालक पदाची वाटचाल सुरू केली. त्यामुळे प्रशिक्षण पुन्हा सुरू करून महिलांना न्याय दिला पाहिजे.

- शिला नाईकवाडे, राज्य महिला संघटक, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबाद