शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेस मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 19:14 IST

Crime News दुचाकीस्वाराने शेताकडे दुचाकी वळविली असता घाबरलेल्या महिलेने दुचाकीवरुन उडी मारली. 

ठळक मुद्दे एएस.क्लब-लिंकरोडवरील दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यानची घटना

वाळूज महानगर : पादचारी ज्येष्ठ महिलेस लिफ्ट देण्याचा बहाणा करुन तिला मारहाण करुन दुचाकीस्वार भामट्याने तिचे दागिने लुटल्याची घटना आज गुरुवार (दि.१८) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ए.एस.क्लब- लिंकरोडवर घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील कुसुमबाई शिंदे (६०, नाव बदलले आहे) ही ज्येष्ठ महिला गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कांचनवाडीला नातेवाईकांना भेटण्यासाठी पायी निघाला होती. ए.एस.क्लबवरुन लिंकरोडकडे पायी जात असतांना काही अंतरावर लाल रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दुचाकीस्वाराने कुसुमबाई यांच्याजवळ दुचाकी थांबवुन त्यांना कुठे जायचे आहे, असे विचारले. यावेळी कुसुमबाई यांनी त्या दुचाकीस्वाराची विचारपुस केली असता त्याने मी चौका ता.फुलंब्री येथील रहिवाशी असल्याचे सांगितले. दुचाकीस्वार मुला समान असल्याची खात्री पटल्यानंतर कुसुमबाई या त्याच्या दुचाकीवर पाठीमागे बसल्या. दरम्यान, काही अंतर पुढे गेल्यावर त्या दुचाकीस्वाराने शेताकडे दुचाकी वळविली असता घाबरलेल्या कुसुमबाई यांनी दुचाकीवरुन उडी मारली. 

यावेळी दुचाकीस्वार तरुणाने मी या परिसरात बटाईने शेती करत असून शेतात पत्नी व इतर मजुर कापुस वेचनी करीत असल्याने त्यांना भेटुन तुम्हाला कांचनवाडीला सोडतो, अशी थाप मारली. मात्र घाबरलेल्या कसुमबाई यांनी दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने त्या दुचाकीस्वार भामट्याने झटापट करीत कुसुमबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिस्कावत एका कानातील कर्णफुले ओरबाडुन घटनास्थळावरुन दुचाकीवरुन फरार झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुसुमबाई यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केल्याने लिंकरोडवरुन ये-जा करणाऱ्या एका वाहनधारकांने तिची मदत करीत पोलिस नियंत्रण कक्षावर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहा.निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक सतीश पंडीत, पोकॉ. विनोद परदेशी आदींनी ए.एस. ते लिंकरोडवर नाकाबंदी करुन भामट्याचा शोध घेतला मात्र भामटा मिळून आला नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद