शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पित असताना तरुणास चाकूने भोसकले

By सुमित डोळे | Updated: January 5, 2024 19:58 IST

आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना

छत्रपती संभाजीनगर : जिन्सी परिसरात नववर्षाच्या सुरूवातीलाच खुन झाला. हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पित असलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. साजेब खान शकिल खान (२२, रा. गल्ली क्रं. १५, बायजीपुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याच्यासोबतच्या मित्रावरही मारेकऱ्याने चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी ४ वाजता बायजीपुऱ्यात हि घटना घडली.

साजेब मित्र सय्यद फैजल सय्यद शायकत (२२, रा. अल्तमश कॉलनी) याच्यासोबत शुक्रवारी दुपारी घराजवळीच एका चहाच्या हॉटेलमध्ये गेला होता. गप्पा मारत असतानाच तेथे त्याच्याच परिसरात राहणारा एक तरुणाने जात थेट शिविगाळ केली. काय झाले हे कळायच्या आतच मारेकऱ्याने खिशातून चाकू काढून साजेबवर वार केले. यात साजेब गंभीर जखमी होऊन खुर्चीवरुन खाली कोसळला. त्याच्यावरील वार थांबवण्यासाठी धावलेल्या सय्य्द फैजलवर देखील मारेकऱ्याने वार केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या साजेबला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. खोल जखम व अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवानाघटनेची माहिती कळताच निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी परिसरातीच असल्याचे कळाल्यानंतर दोन पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाले. तर जखमी सय्यद फैजल ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद