शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘बटन की गोली’; नशेसाठी झोपेच्या गोळ्यांचा तरुणांकडून वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 14:03 IST

गोळ्या मिळविण्यासाठी काहीही करण्याची प्रवृत्ती

ठळक मुद्देमानसिक आजारांबरोबर शारीरिक आजारएकाच वेळी १० ते ५० गोळ्यांचे सेवन

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : अमली पदार्थ म्हणून तरुणाई दिवसेंदिवस नशेच्या गोळ्यांच्या आहारी जात आहे. नशेसाठी थेट झोपेच्या गोळ्यांचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच झोपेच्या गोळ्यांची ‘बटन की गोली’ म्हणून सर्रास विक्री केली जात आहे. व्यसन वाढल्यानंतर गोळ्या मिळविण्यासाठी काहीही करण्याची प्रवृत्ती व्यक्तीत तयार होते. शिवाय माानसिक आजारांबरोबर शारीरिक आजारांना तोंड द्यावे लागते, असे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.

नशेच्या गोळ्यांसाठी पैसे न दिल्याच्या रागातून तिघांनी एक ाचा धारदार चाकूने वार क रू न निर्घृण खून के ल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री पडेगाव परिसरात घडली. गेल्या काही वर्षांत नशेच्या गोळ्यांमुळे तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले.  घाटीतील मानसोपचार विभागात व्यसनापासून सुटका होण्यासाठी महिन्याकाठी किमान दीडशेवर रुग्ण येतात. यामध्ये दारूसह अनेक गोष्टींच्या व्यसनांचा समावेश असतो. काहींची स्वत:हून व्यसन सोडण्याची तयारी असते, तर काहींना कुटुंबीय बळजबरीने घेऊन आलेले असतात. वाढलेल्या व्यसनामुळे अनेक दुष्परिणाम होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.  

गोळी सेवनानंतर काय होते? गोळीतील रासायनिक घटकांमळे झोप येते. अनेक आजारांत ते महत्त्वाचे ठरते; परंतु व्यसनापोटी अनेक गोळ्या घेतल्या जातात. त्यातून हळूहळू गोळ्यांची संख्या वाढते. शेवटी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गोळीची सवय लागते. त्यातून त्याचे व्यसनात रूपांतर होते. या गोळ्यांचे व्यसन वाढते आणि त्याची खरेदी करण्यासाठी पैशांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. गोळ्या खरेदीसाठी पैसे मिळविण्यासाठी नशेखोर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रांकडे याचना करतात. पैसे मिळाले नाहीत, तर भांडण, प्रसंगी मारामारी करतात. अनोळखी व्यक्तींना धमकावून, मारहाण करून पैसे लुटण्यास ते घाबरत नाहीत. त्यातून अनेक गैरकृत्ये त्यांच्या हातून घडतात.

एकाच वेळी १० ते ५० गोळ्यांचे सेवनव्यसनाचे प्रमाण व्यक्तीमध्ये वाढल्यानंतर एकाच वेळी १० ते ५० गोळ्या खाण्याचे प्रकार होतात. असे अनेक रुग्ण यापूर्वी समोर आलेले आहेत. गोळ्यांसोबत किमान दोन ते तीन अमली पदार्थ एकत्र करून सेवन करण्याचा प्रकारही होतो.

काही पानटपऱ्यांवरही विक्रीशहरातील काही पानटपऱ्यांवर या ‘बटन’ गोळीची सर्रास विक्री होत आहे. गोळ्या खाल्ल्यानंतर इतर व्यसन केल्यानंतर येतो तसा कोणताही वास येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य घरांतील मुलांबरोबर उच्चस्तरातील मुलेही गोळ्यांच्या व्यसनाला बळी पडत आहेत. काही जण चौपट-पाचपट पैसे घेऊन गोळ्यांची विक्री करीत आहेत.  युवा पिढीला या नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शहरात तपासणी मोहीम राबविण्याची गरज आहे.

व्यसन सुटणे शक्यझोपेच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी होत असल्याचे दिसते. या गोळ्या ‘बटन की गोली’ म्हणून ओळखली जाते. ज्याप्रमाणे इतर व्यसनांचे प्रमाण वाढते, त्या प्रकारे अधिक गोळ्या खाऊन नशा केली जाते. गोळ्या सेवन करताना सोबत व्हाईटनरसह अन्य अमली पदार्थ घेण्याचाही प्रकार होतो. झोपेच्या या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी दुकानांनी विक्री करता कामा नये.  योग्य वेळी उपचार घेतल्यास व्यसन सुटणे शक्य आहे.- डॉ. संजय घुगे, मानसोपचारतज्ज्ञ, घाटी

नशेमुळे होणारे मानसिक परिणाम- चिडचिडेपणा वाढणे.- सतत अस्वस्थ राहणे.- कशाची तरी नाहक भीती वाटणे.- वेगवेगळ्या प्रकारचे भास होणे.- उदासीनता निर्माण होते.- नशेमुळे होणारे शारीरिक परिणाम- सतत हात थरथर कापणे.- सतत घाम येत राहणे.- हृदयाचे ठोके वाढणे.- हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका.- मेंदूचा झटका येण्याचा धोका.- लिव्हर, पोटाचे आतडे खराब होणे. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थmedicineऔषधंAurangabadऔरंगाबाद