शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! कोरोनाच्या कहरमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची लहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 13:04 IST

शारीरिक अंतर पाळण्याचा नियम धाब्यावर बसवून येथील नागरिकांनी या पार्टीत सहभाग घेतला. 

ठळक मुद्देसंजयनगर, रामनगर आणि पुंडलिक नगर हे हॉटस्पॉट जवळचा परिसर

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा कहर वाढत असून रुग्णसंख्या ६५१ वर पोहोंचली आहे. मात्र काही नागरिकांना याबाबत गांभीर्य नसून सिडको एन -३ येथील कैलास अपार्टमेंटच्या परिसरात दोन कुटुंबांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजयनगर, रामनगर आणि पुंडलिक नगर हे हॉटस्पॉट जवळ असतानाही शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमाचा उल्लंघन करून या उच्चभ्रू सोसायटीत अशा पद्धतीने नागरीक एकत्र आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी याची दखल घेतली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, संजयनगर व पुंडलिकनगर या हॉटस्पॉटजवळ सिडको एन -३ चा भाग येतो. येथील कैलास अपार्टमेंटमध्ये अनुप विजयप्रकाश असोका व दत्तात्रय विश्वनाथ जाधव हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. सोमवारी असोफा आणि जाधव यांच्या दोघांच्याही लग्नाचा वाढदिवस होता. यामुळे त्यांनी रात्री १० वाजेच्या दरम्यान लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोसायटीमधील १२ ते १५ जणांचा जमाव जमवला. तसेच अपार्टमेंटच्या खालील सार्वजनिक जागेत त्यांनी टेबल मांडून सर्वांसोबत केक कापला. यावेळी शारीरिक अंतर पाळण्याचा नियम धाब्यावर बसवून येथील रहिवास्यांनी या पार्टीत सहभाग घेतला. 

याची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस स्टेशनचे एल.बी. हिंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुप विजयप्रकाश असोका व दत्तात्रय विश्वनाथ जाधव यांच्यासह उपस्थित १२ ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणे येथील नागरिकांना चांगलेच महागात पडले असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी