औरंगाबाद - नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जागा मिळवण्यासाठी तलावर फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. जसपाल दर्शनसिंग (वय २७ वर्ष), हरदिप गुरचरणसिंग (वय ३५ वर्ष) या दोन जणांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तपोवन एक्स्प्रेस शुक्रवारी (6 ऑक्टोबर) दुपारी औरंगाबादहून सुटताच गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची एकच झाली. यातच या दोघांनी बोगीत चक्क तलवार फिरवत जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यादरम्यान कुणीही जखमी झाले नाही. या प्रकारानंतर रेल्वे मनमाडला पोहोचल्यावर सतीश सराफ यांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून मनमाड लोहमार्ग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिर्झा बेग करत आहेत.
धक्कादायक ! एक्स्प्रसेच्या बोगीतील जागेच्या वादातून फिरवली तलवार, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमधील थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 15:42 IST