शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! गर्भवती असल्यामुळे ती आनंदी होती; मात्र अचानक गळफास घेऊन तिने संपवले दोन जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 14:15 IST

तिने अचानक असा टोकाचा निर्णय का घेतला असा प्रश्न नातेवाईक आणि पोलिसांना पडला आहे.

ठळक मुद्देवर्षभरापूर्वी विवाह झालेल्या गर्भवती विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद: वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन परिसरातील सादातनगर येथे घडली.

रुफेदा बेगम असलम बेग (वय १९, रा. सादातनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. रुफेदा आणि असलम यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला. ती सहा महिन्यांची गर्भवती होती. अस्लम हा कॅनॉट प्लेसमध्ये मोबाईल शॉपीवर नोकरी करतो. आज सकाळी ७ वाजता तिने पतीला झोपेतून उठवले. मात्र, आज कामावर जायचे नाही, असे सांगून असलम झोपी गेला. नंतर रुफेदाने वरच्या मजल्यावरील स्टुल आणून बेडरुममधील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास अस्लम झोपेतून उठल्यावर त्याला पत्नीने गळफास घेतल्याचे दिसले. 

यावेळी त्याने आरडाओरड केल्यावर घरातील लोक त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी ओढणी कापून रुफेदाला खाली उतरवले. यानंतर सातारा पोलीस आणि मयताच्या माहेरी फोेन करून घटनेची माहिती कळविण्यात आली. तिला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता अपघात विभागाच्या डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सातारा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. रुफेदा हिचे काल गुरुवारी माहेरी बोलणे झाले होते. गर्भवती असल्यामुळे ती आनंदी होती. मात्र, तिने अचानक असा टोकाचा निर्णय का घेतला असा प्रश्न नातेवाईक आणि पोलिसांना पडला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद