शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
५ घटनांचा दाखला दिला, राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
3
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
4
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
5
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
6
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
7
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
8
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
9
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
10
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
11
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
12
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
13
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
14
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
15
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
16
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
17
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
18
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
19
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
20
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल

धक्कादायक ! सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपविले जीवन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:21 IST

suicide of girl नेहमी हसत खेळत राहणारी संजवणीने आत्महत्यासारखा टोकाचा पाऊल एवढ्या कमी वयात का उचलले याचे कारण समोर आले नाही.

ठळक मुद्देगारखेडा परिसरात राहणारी संजीवनीचे आई-वडील दोन्ही चणे - फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात.

औरंगाबाद :  सातवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीने गळफास घेउन  आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री  गारखेडा परिसरातील आनंदनगरात घडली. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे  (रा.गल्ली क्र.4 आनंदनगर, गरखेडा परिसर) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.

गारखेडा परिसरात राहणारी संजीवनीचे आई-वडील दोन्ही चणे - फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे  तिचे आई वडील आणि लहान भाऊ एकत्रित व्यवसायासाठी काल घराबाहेर पडले होते.  रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते घरी आले असता. घराचा बाहेरील दरवाजा आतून बंद होता.   आवाज दिला असता तीने प्रतिसाद दिला नाही. लहान भाऊ जेंव्हा घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेंव्हा संजीवणीने साडीच्या साहाय्याने छताच्या लोखंडी अंगलला गळफास घेतल्याचे त्याला  दिसले. त्याने भेदरलेल्या अवस्थेत ही माहिती आई वडिलांना सांगितली. यानंतर नातेवाईकांनी आरडाओरड केल्यावर शेजारी जमा झाले, त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी संजीवणीला फासावरून खाली उतरवत घाटी  रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. 

नेहमी हसत खेळत राहणारी संजवणीने आत्महत्यासारखा टोकाचा पाऊल एवढ्या कमी वयात का उचलले याचे कारण समोर आले नाही. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरिक्षक मीरा चव्हाण करीत आहेत..

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद