शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! स्तनदा मातांना दिलेल्या पोषण आहाराच्या पॉकेटमध्ये निघाला सडलेला उंदीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 19:22 IST

गव्हाचे सीलबंद पॉकेट उघडले असता त्यातून दुर्गंधी येऊन सडलेला उंदीर आढळला.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: अंगणवाडीमधून ९ महिन्याच्या  बाळाच्या आईस देण्यात आलेल्या गव्हाच्या सिलबंद पॉकेटमध्ये चक्क सडलेला उंदीर निघाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता तालुक्यातील धोत्रा येथे उघडकीस आली. 

धोत्रा येथील अंगणवाडीतून ९ महिन्याच्या विश्वजित प्रमोदसिंग जाधव या लहान बाळाचे पोषण आहार अंतर्गत मिळणारे धान्य अंगणवाडी सेविका भागाबाई गवळी यांनी मुलाची आई माधुरी जाधव यांना शुक्रवारी दिले होते. माधुरी जाधव यांनी ते पॉकेट घरात ठेवले. मंगळवारी दुपारी ते पॉकेट उघडले असता दुर्गंधी येऊन त्यात सडलेला उंदीर आढळून आला. त्यांनी याची माहिती अंगणवाडी सेविका मदतनीस , सरपंच यांना दिली.

त्यानंतर सरपंच पदमाबाई जाधव, नागरिक आनंदसिंग जाधव, विशाल जाधव, प्रमोद जाधव, पंकज जाधव, अंगणवाडी सेविका भागाबाई गवळी, मदतनीस सुलोचना जाधव, नंदकिशोर जाधव, मंडाबाई पालोदकर, मंगलाबाई दांडगे, उषा सपकाळ, हेमलता पाटील यांनी अंगणवाडीमध्ये जाऊन इतर आहाराची पाहणी केली. इतर आहारात काहीही निघाले नाही. उंदरी निघालेल्या पॉकेटचा पंचनामा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग आयुक्तालय एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत महाराष्ट्र स्टेट कंझुमर फेडरेशन मुंबईकडून आलेला या पॉकेटमध्ये मेलेला उंदीर निघाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

अहवाल आल्यानंतर कारवाईपॉकेट जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल. अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनी विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.- दीपक मेहेत्रे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास,सिल्लोड

आमचा दोष नाहीआठ दिवसांपूर्वी आलेला पोषण आहार शुक्रवार व शनिवारी वाटप केला. एका बंद पॉकेटमध्ये मेलेला उंदीर निघाला आहे. मात्र, यात आमचा दोष नाही.- भागाबाई गवळी, अंगणवाडी सेविका, धोत्रा

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPregnancyप्रेग्नंसी